पान:अयोध्येचे नबाब.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ श्रीउद्दीन दिलाबादची सुभेदारा कामी पेशव्या ३ रा. ] मनसूरअल्ली सफदरजंग. नव्हे. थोडासा तोटा जाहला तरी सोसून स्नेह रक्षणे उचित असे." ह्यावरून सफदरजंगासारखा उमदा वजीर राजी राखून, पुढील कार्यभाग साधण्याचा पेशव्यांचा हेतु किती मुत्सद्दीपणाचा होता हे चतुर वाचकांस सांगणे नकोच. । होळकर व शिंदे दिल्लीस असतांना तेथे त्यांचा व निजामउल्मुल्काचा मुलगा गाझीउद्दीन ह्याचा बराच स्नेह जडला.. हा गाझीउद्दीन दिल्लीदरबारी असल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ नासिरजंग ह्यानें हैदराबादची सुभेदारी बळकाविली होती. तेव्हां गाझीउद्दीन ह्याने ती परत मिळविण्याचे कामी पेशव्यांचे साहाय्य मागितले होते. पेशव्यांनी ते देण्याचे कबूल करून, दिल्लीच्या बादशहास, गाझीउद्दीन ह्यास दक्षिणेत पाठविण्याबद्दल पत्रे लिहिली व होळकरास त्यास घेऊन येण्याबद्दल सांगितले. त्याप्रमाणे होळकर व शिंदे दिल्लीचा कारभार आटोपून त्याच्यासह औरंगाबादेस आले. तो दिल्लीकडे पुनः गडबड उडाली. इ० स० १७५२ मध्ये अहमदशहा अबदाली पुनः पंजाबावर स्वारी करून आला. बादशहानें वजीर सफदरजंग ह्यास मदतीस बोलाविले; परंतु तो तेथे येऊन पोहोचण्यापूर्वीच अहमदशहाने मुलतान आणि लाहोर हे प्रांत हस्तगत केले व दिल्लीवर येण्याची भीति घातली. तेव्हां बादशहाने त्यास ते दोन्ही प्रांत देऊन पुढील अरिष्ट टाळले. :. इकडे गाझीउद्दीन औरंगाबादेस जाऊन दक्षिणची सुभेदारी मिळविण्याचा यत्न करीत होता. तो विषप्रयोगानें ता० १२ सप्तबर इ० स० १७९२ रोजी मारला गेला. ही बातमी दिल्लीस समजतांच त्याचा मुलगा मीर शहाबुद्दीन ह्याने दुःखसागरांत बुडाल्याचे सोंग करून वजीर सफदरजंग ह्यास आपल्या मायावी भाषणानें मोहित केले, आणि त्याजकडून 'गाझीउद्दीन' हा किताब व 'अमीर-उल-उमरा' .