पान:अयोध्येचे नबाब.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

maramanawwwwwwwwwwanmarnmaza wwwmaran ર अयोध्येचे नबाब. [भाग हिंदुधर्माचे रक्षण करण्याचे आपलें ब्रीद उत्तम प्रकारे चालवावे असा फार हेतु होता. एवढ्याकरिता त्यांनी सफदरजंगाकडून ती मिळविण्याचा यत्न चालविला होता. ही स्थाने मागे पुढे प्राप्त होतील असें समजून श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी शिंदे व होळकर ह्यांस सफदरजंगाशी स्नेह संपादून व पुनः रोहिल्यास तो साहाय्य न करी असे करून दिल्लीहून देशी येण्याविषयी लिहिले. त्यांचा मुख्य उद्देश दिल्लीदरबारांत सर्वांची मर्जी खुष ठेवून व प्राप्तलाभांत संतोष मानून तूर्त मराठे सरदारांनी परत यावे असा होता. त्यांनी शिंदे होळकर यांस असे लिहिले की :__ "सफदरजंग यास * निमरजावंद करून आपले लगामी लावावयाचा विचार केला असे, म्हणन लिहिले ते कळले. ऐशियास हा विचार उत्तम केला. आम्हांस दिल्लीहून लिहिले आले होते. आम्हीही त्यास येविशीं विचारानुरूप लिहिणे ते लिहून त्यास लगामी लावू द्यावें, त्यांनी रिकारपूर्वकाचे साह्य न करावे असे करावे, म्हणोन लिहिले असे. तुम्हीही त्यास वरचेवर उचित जाणून लिहीतच असाल व लिहिणे. ज्यांत आपल्या मनसुबियास व कर्तव्यतेस उचित आणि उपयोगी, परिणाम उत्तम, लोकोत्तर, योग्यतर, लौकिक कीर्तिस्पद, तेच करणे व कराल हा निशा आहे. सफदरजंग उमदा मनुष्य, त्याचा स्नेह हरप्रकारे करणे उचित. दुसरे, काशी त्याचे हाती. ह्याशी निखालसता असलिया कालगतीने काशीचे स्पष्ट दर्शन होणार, तो महालाभ आहे. यासाठी स्नेह रक्षावा. दुसरें अत्यंत अर्थाअर्थी संबंध नाहीं जाहला. आप्रिय भाषण करून विग्रह वाढविणे उचित

  • निमरजावंद:-( निम=अर्धा. रंजावंद खुषी) कांही त्यासारखे करून, काही त्याचे ऐकून.

+ रकारपूर्वकः-रकार आहे ज्या शब्दाचे पूर्वी ते ह्मणजे रोहिले.