पान:अयोध्येचे नबाब.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा.] मनसूरअल्ली सफदरजंग. ३१ बाळाजी बाजीराव पेशवे यांस हे मराठ्यांच्या पराक्रमाचे संतोषवृत्त समजताच त्यांनी शिंदे होळकर ह्यांचे फार फार गौरव केले. त्यांनी हा एवढा बिकट मनसुबा सिद्धीस नेऊन “वजीर मोडला, पळाला असतां फिरोन फत्तेच्या मसनदीवर बसविला" आणि इराण तुराणपावेतो लौकिक गाजविला, ह्याबद्दल त्यांस शाबासकी दिली. ह्या संबंधाने बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी जयाजी शिंदे ह्याच्या पत्रांत काढलेले उद्गार हृदयाल्हादक आहेत. ते लिहितातः-"तुझी एकनिष्ठ सेवक, उमदी उमदी कामें दूरदेशीनें मनांत आणून त्यांचे ठायीं नेट मारून करणे आणि शिपाईगिरीची व मनसुबेबाजपणाची शर्त करून यशास पात्र व्हावे तसेंच आहां. तदनुसार हे महत् यश घेऊन वजीरास पठाणांनी व रोहिल्याने फरारी करून तमाम दिल्लीपर्यंत आक्रमशक्ति केली असता त्यांची पुस्तपन्हा करून त्यांसी नतीजा देऊन नेस्तनाबूत केले. वजीराचा बोलबाला करून, पादशाहास रोहिले पठाण घेऊ चहात होते ते पादशाहाच्या घरांत राखोन, त्यास संतोष व वचनास खरेपणा, महत् यशाची पराकाष्ठा होऊन, स्वामीसेवा, पैका व यश आजितागायत जहाली नाही ती करून दाखविलीत. याजवरून फार संतोष झाला. तुम्हांस योग्य तेंच केले व पुढेही कराल हा निशाच आहे.'* अशा प्रकारचे स्वामीगौरवाचे अमृततुल्य मनोरम उद्गार ऐकून कोणाचे हृदय हर्षभरित होणार नाही ? - वजीर सफदरजंग ह्यांच्या साहाय्याने मराठ्यांस अर्थलाभ व कीर्तिलाभ चांगला झाला. तथापि त्यांचा, काशी व प्रयाग ही हिंदूंची पुण्यस्थाने यवनाच्या ताब्यात होती ती हस्तगत करून तेथे आपला अंमल बसवावा व तेथील धर्मकृत्ये यथास्थित चालवून * “ पत्रे, यादी वगैरे” लेखांक ३६४.