पान:अयोध्येचे नबाब.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग FREE ALFAI .I.AAR .N ET ह्या युद्धामध्ये मराठ्यांचे अलौकिक शौर्य व्यक्त होऊन त्यांचा अतिशय फायदा झाला. ह्या वेळी मराठ्यांस रोहिलखंडांतील पुष्कळ लूट सांपडून सफदरजंगाकडून बराच पैसा प्राप्त झाला. सफदरजंगानें अहमदखान पठाण व रोहिले ह्यांच्यांशी आपल्या इच्छेप्रमाणे तह करून आपला सर्व मुलख त्यांच्या ताब्यांतून मुक्त केला. ह्या वेळी त्याने मराठे सरदारांस रोख पैसा किती दिला ह्याचा उल्लेख बरोबर सांपडत नाही. मि० आयहिन हे लिहितात की, सफदरजंग व मराठे ह्यांनी पठाणाकडून अर्धा मुलूख व ३० लाख रुपये बादशाही खंडणी ठरवून घेतली, सर जॉन स्ट्रेची लिहितात की, सफदरजंग ह्याने रोहिल्यांकडून ५० लक्षांचे दस्तऐवज व ५ लक्ष रुपये प्रतिवार्षिक बादशाही खंडणी मान्य करून घेतली, व हेच दस्तऐवज मराठ्यांच्या स्वाधीन केले. होळकरांच्या कैफियतीमध्ये लिहिले आहे की, सफदरजंगाने मराठ्यांस "कुचाचे लाख व मुक्कामाचे पन्नास हजार" येणेप्रमाणे "पेसा कवडी कवडी चुकवून दिला". ह्यांपैकी खरी गोष्ट कोणती ह्याचा. बरोबर निर्णय करण्यास साधन नाही. तथापि ह्या पठाणयुद्धामध्ये खुद्द पेशव्यांस ९॥ लक्ष रुपयांचा प्रांत अंतर्वेदीमध्ये मिळाला व शिंदे होळकर ह्यांस ६॥ लक्षांचा प्रांत मिळाला, अशी माहिती मिळते. सफदरजंगाने मराठ्यांचे कृतोपकार स्मरून शिंदे होळकर ह्यांस दिल्ली येथे आपल्या बरोबर नेले व तेथें बादशहाची व त्यांची मुलाखत घालून देऊन त्यांचा बहुमान केला. दिल्लीदरबारांत मराठ्यांची वाहवा झाल्यामुळे त्यांचे वजन उत्तर हिंदुस्थानांत विशेष वाढले व त्यांच्या पुढील उत्कर्षास ते कारण झाले, महत्त्वाची असून त्यांच्याच आधाराने वरील हकीकत लिहिली आहे. अस्सल आधार मिळाल्यानंतर मग इंग्रजी आधारांची त्यापुढे मातबरी नाही.