पान:अयोध्येचे नबाब.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा.] मनसूरअल्ली सफदरजंग. २९ नजराणा सादर केला. येणेप्रमाणे आपला पराभव झाला असतांही बादशहावर छाप ठेवून सफदरजंग दिल्लीहून रोहिल्यांचा व पठाणांचा समाचार घेण्यास अयोध्येकडे पुनः परत आला. सफदरजंगास अयोध्याप्रांत आपल्या हातून गेला असें समजतांच त्याने हरप्रयत्न करून तो मिळविण्याचा दृढ निश्चय केला. त्याने ह्या प्रसंगी मराठ्यांवांचून दुसरे कोणी साहाय्य करण्यास समर्थ नाहीत असें पाहून त्यांस मदतीस बोलाविले. ह्या वेळी मराठ्यांचे सरदार जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर आपल्या सैन्यानिशी जयपूर प्रांती होते. त्यांची व नबाब वजीर सफदरजंग ह्यांची भेट झाली. नंतर ते यमुना पार होऊन कादरगंजाजवळ आले. तेथे त्यांनी पठाण सरदार दहा हजार फौजेसुद्धा बुडविला. नंतर अहमदखान पठाण प्रयाग प्रांती आसरा करून होता. तो फरकाबादेस आला. तेव्हां मराठे सरदारांनी आपलें बुणगें कोस दोन कोस ठेवून सडे फौजेनिशी मोर्चेबंदी केली. उभयतांचे युद्ध एकसारखे २५ दिवस झाले. परंतु पठाणास रोहिल्यांचे साहाय्य असल्यामुळे त्यास गंगेपलीकडून सामानसरंजाम पोहोचत होते. त्यामुळे ते लवकर जेरीस येईनात. तेव्हां मराठ्यांनी, वजीर सफदरजंग आपल्या छावणीपासून पांच कोसांवर कनोजनजीक होता, त्याच्याकडून गंगेस नावांचा पूल बांधवून, निवडक फौजेनिशी गंगापार होऊन, पठाणाची फौज रोहिलेसुद्धां तीस हजार होती तिशी गांठ घालून, पठाण लुटून मारून फस्त केला. तेच दिवशी रात्री अहमदखान पठाण पळून गेला. त्याचा पिच्छा करून त्यास बुडविला. दत्ताजी शिंदे यांणी फार फार शर्त केली. हत्ती, घोडे, उंट, निशाणे सर्व लुटून आणिली.*

  • या पठाणयुद्धाच्या संबंधाची नंबर १६२, १६३ आणि ३६४ अशी तीन पत्रे काव्येतिहाससंग्रहांतील “पत्रे यादी" मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ती फार