पान:अयोध्येचे नबाब.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ अयोध्येचे नबाब. [ भाग सैरावैरा पळू लागले. अशा रीतीने सफदरजंगासारख्या वरिष्ठ वजिराचा पराभव केल्यामुळे पठाण व रोहिले विजयश्रीने फुगून गेले व आतां सर्व अयोध्या प्रांताचे आपण अनियंत्रित धनी झालों असें मानून ते आनंदांत निमग्न झाले. वजीर सफदरजंग ह्याचा पराभव झाला ही बातमी दिल्लीदरबारी समजतांच, तेथे त्याचा मत्सर करणारे जे लोक होते त्यांनी बादशहाचें मन कलुषित करून त्याला वजिरीवरून दूर करण्याचा प्रयत्न चालविला. ही गोष्ट सफदरजंगास समजताच त्याने प्रथम दिल्लीदरबारी जाऊन बादशहाची भेट घेतली व त्यास आपल्या मोहक भाषणाने सुप्रसन्न केले. त्या वेळी त्याने सादी कवीनें म्हटल्याप्रमाणे: वंदे हमान बे के झे तक्सीरे खीष, उझर बेदर्गाहे खुदा आवरद ; वर्ने सझावारे खुदावंदीष, कस् न तवानद के बजा आवरद.* हे वाक्य म्हणून दाखवून बादशहाची क्षमा मागितली. बादशहास त्याचे भाषण ऐकून संतोष झाला व त्याने त्यास क्षमा करून एक बहुमूल्य पोषाख, मोत्यांची कंठी, तलवार, व हत्तीघोडा बक्षीस दिला.. ह्या वेळी सफदरजंगानेही बादशहास पंचवीस लक्ष रुपयांचा नजर

  • ह्याचा भावार्थ असा आहे की, ईश्वरविषयक कर्तव्य करण्यास ज्या अर्थी मनुष्य समर्थ नाही त्या अर्थी त्याने आपले अपराध ईश्वराजवळ कबल करून त्याची क्षमा मागावी हेच त्यास योग्य आहे. ही कविता गुलिस्तान ग्रंथांतील असून ती सादीने ईश्वराची ग्रंथारंभी स्तुति करितांना लिहिलेली आहे. ही सफदरजंगानें बादशहाजवळ म्हणून दाखऊन तीत त्याची स्तुति कशी खुबीन केली आहे हे रसिक वाचकांच्या तेव्हांच लक्ष्यांत येईल.