पान:अयोध्येचे नबाब.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा. ] मनसूरअल्ली सफदरजंग. मनसूरअक्षात २७ त्याचा प्रांत लुटून तो अयोध्येमध्ये सामील केला, आणि त्याचा सर्व कारभार आपला दिवाण राजा नवलराय ह्याच्या हाती देऊन आपण दिल्लीस गेला. ____परंतु इकडे "की तोडिला तरु फुटे अणखी भरानें" ह्या वामन पंडितांच्या उक्तीप्रमाणे काइमखानाचा मुलगा अहमदखान ह्यास रोहिल्यांनी पुनः उत्तेजन देऊन युद्धास प्रवृत्त केले. ह्या वेळी त्यास उत्तेजन येण्यास एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. अयोध्येचा दिवाण राजा नवलराय ह्याच्या नौकरांनी एका पठाण स्त्रीचा कांहीं अपमान केला; म्हणून ती अहमदखानाकडे जाऊन म्हणाली की, "अहमदखान, तूं डोक्यावर पगडी कशास बाळगतोस? मजसारख्या पठाण स्त्रीचा काफिरांनी तुझ्या समक्ष अपमान करावा त्यापेक्षां तुझें पुरुषत्व व्यर्थ आहे! ह्यापेक्षां तुझ्या बापास अल्लाने मुलगी दिली असती तर बरे झाले असते!!" हे शब्द ऐकून त्यास आवेश उत्पन्न झाला. त्याने अयोध्येच्या नबाबाच्या वतीने फरकाबाद येथे जो कोतवाल होता त्याचा शिरच्छेद करून व तें शहर हस्तगत करून तेथे आपला झेंडा उभारला, आणि राजा नवलराय ह्याशी कढाई करून त्यास कालीनदी येथे ता० ३ आगष्ट इ० स० . १७५० रोजी ठार मारिलें. अशा रीतीने अहमदखान बंगष याने आपली गादी पुनः स्थापिली व सर्व रोहिले व आपण एक होऊन अयोध्या प्रांतावर स्वाऱ्या करण्यास सुरवात केली. ही गोष्ट सफदरजंग वजीर ह्यास दिल्लीस कळतांच त्याने सुरजमल्ल जाट ह्याचे सैन्य मदतीस घेऊन अहमदखानावर स्वारी केली. परंतु त्यामध्ये त्याचाच पराभव झाला व त्यास जखमा लागल्या, तेव्हां त्यास मोठ्या दुःखाने पळून जाणे भाग पडले. त्याचा हत्ती नाहीसा होतांच सर्व सैन्यांत एकच गोंधळ झाला आणि तें वाटेल तिकडे