पान:अयोध्येचे नबाब.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग wwww आपल्या नांवाने राज्यकारभार चालविला. तो इतक्यांत त्याजवर काळाची नजर पोहोंचून तो इहलोकांतून नष्ट झाला. त्यास सहा पुत्र होते. त्यांपैकी दोघे वडील पुत्र अबदालीने आपल्या बरोबर नेले होते व बाकीचे चार लहान होते, म्हणून त्याने राज्याची सर्व व्यवस्था आपला भाऊ हाफिज रहिमतखान याजकडे सोपविली होती, आणि त्यास मदतगार म्हणून आपला भाचा दुंडीखान ह्यास नेमिलें होतें. ह्या उभयतांनी रोहिल्यांची सत्ता वाढविण्याचा एकसारखा यत्न केला. ह्यांचेच जोडीदार फरकाबादचे बंगष पठाण हे असून ते मध्य दुआबामध्ये आपली सत्ता चालवीत होते. दोघांचे वर्चस्व अयोध्या प्रांतास विघातक होईल असे समजून ते समूळ नष्ट करण्याचा यत्न सफदरजंग ह्याने केला, व त्या कामांत त्याने मराठ्यांचे साहाय्य घेतले. हाच मराठ्यांचा रोहिलखंडांतील मूळ प्रवेश होय. सफदरजंगाने प्रथमतः रोहिलखंडामध्ये दिल्लीच्या बादशहाकडून नवीन नवीन अधिकारी पाटवून तेथील रोहिले लोकांचे प्राबल्य कमी करण्याचा निश्चय केला. त्याने कुतबुद्दीन नामक एका इसमास मुरादाबादेचा फौजदार नेमून तिकडे पाठविले. त्याने रोहिलखंडावर स्वारी केली. परंतु रोहिल्यांचा सेनापति दंडीखान ह्याने त्याशी लढाई करून त्यास ठार मारिलें. तेव्हां सफदरजंगानें रोहिल्यांचे पारिपत्य करण्याकरितां त्यांच्यांत भेद करून त्यांची शक्ति नाहीशी करण्याची युक्ति योजिली. त्याने फरकाबादेचा नबाब काइमखान बंगष याचेकडून रोहिल्यांवर स्वारी करविली. त्याची व रोहिल्यांचे पुढारी हाफिज रहिमत आणि दुंडीखान यांची लढाई इ० स० १७५० मध्ये बदाऊनजवळ झाली. त्यांत काइमखान रोहिला मारिला जाऊन फरुकाबादच्या नबाबाचें बल कमी झाले. सफदरजंगास एक शत्रु आपोआप नाहीसा झाला असे वाटून त्याने