पान:अयोध्येचे नबाब.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा.] मनसूरअल्ली सफदरजंग. २५ हताश होऊन अल्ली महमद रोहिल्याचे अबदुल्ला व सयदुल्ला असे दोन पुत्र बरोबर घेऊन कंदाहारास परत गेला. ह्या पराक्रमाबद्दल मीरमनू ह्यास लाहोर व मुलतान येथील सुभेदारी मिळाली. हे यशस्वी सैन्य सफदरजंगासहवर्तमान दिल्लीस आले. परंतु तें तेथें येण्यापूर्वीच, महमदशहा बादशहा मृत्यु पावला. त्यामुळे सर्व लोकांचा विजयोत्सव कमी होऊन सर्वांस फार दुःख झाले. महमदशहाच्या मागून त्याचा मुलगा अहमदशहा हा ता० १९ एप्रिल इ० स० १७४८ रोजी सिंहासनारूढ झाला. त्याने पूर्वांचा वजीर कमरुद्दीनखान हा सरहिंदच्या लढाईत मारला गेल्यामुळे नबाब मनसूरअल्ली सफदरजंग ह्यास 'वजीर' हे महत्पद दिले. मनसूरअल्ली ह्यास ह्या पदाची फार दिवसांपासून लालसा होती. ती सफल झाली त्यामुळे 'अमृतं राजसन्मानम् ' ह्या म्हणीप्रमाणे त्यास अयंत आनंद झाला. ह्याच वेळेपासून अयोध्येच्या नबाबास 'नबाबवजीर' हे संयुक्त पद प्राप्त झाले. मनसूरअल्लीस वजिरी प्राप्त झाल्यानंतर दिल्लीदरबारांत त्याचे अतिशय वजन वाढले व त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व राज्यकारभार होऊ लागला. ह्याच सुमारास दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडून आली. सफदरजंगाचा पूर्वीचा शत्रु व रोहिल्यांचा नायक अल्ली महमद हा ता० १६ माहे सप्तंबर इ० स० १७४८ रोजी मृत्यु पावला. ह्यास अहमदशहा दुराणीच्या स्वारीमुळे पुनः रोहिलखंडाची सुभेदारी प्राप्त झाली होती हे वर सांगितलेच आहे. त्याने लागलीच संधि साधून रोहिलखंडाचा सर्व भाग आपल्या ताब्यामध्ये घेतला व प्रत्येक ठिकाणी पठाण अधिकाऱ्यांची योजना करून सर्व प्रांत स्वतंत्र करण्याचा यत्न चालविला. त्याने बरेली जिल्ह्यामध्ये औनला ( Aonla) येथे आपली राजधानी केली, आणि आपणास स्वतंत्र सुभेदार म्हणवून