पान:अयोध्येचे नबाब.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ अयोध्येचे नबाब. [भाग तशीच कायम राहिली. पुढे लवकरच-म्हणजे इ० स० १७४८ मध्ये अहमदशहा अबदाल्ली याची हिंदुस्थानावर स्वारी झाली. त्यामुळे दिल्लीपतीचें व सफदरजंगादि प्रमुख सरदारांचे लक्ष्य तिकडे लागले. इ०स० १७४८ च्या जानेवारी महिन्यामध्ये अहमदशहा अबदाल्लीज्याचें नांव पानिपतच्या घनघोर रणसंग्रामामुळे महाराष्ट्राच्या इतिहासांत लाल रक्ताने लिहिले गेले आहे-तो प्रचंड सैन्यानिशी हिंदुस्थानावर चालून आला. ह्याने हिंदुस्थानावर एकंदर चार स्वाय केल्या. त्यांपैकी ही त्याची पहिली स्वारी होय. तो प्रथमतः लाहोरास आला. तेथे त्यास लाहोरचा सुभेदार शहानिवाजखान ह्याने अटकाव केला; परंतु त्याने त्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला, तेव्हां तो पळून दिल्लीस आला. तो दिल्लीस आल्यानंतर बादशहास मोठे संकट पडले. नंतर त्याने वजीर कमरुद्दीनखान, मनसूरअल्ली सफदरजंग, सलाबतजंग, सवाई जयसिंगाचा पुत्र महाराज इस्रीसिंगप्रभृति मुख्य मुख्य अमीरउमरावांस एकत्र करून व आपला मुलगा अहमदशहा ह्यास सैन्याचे आधिपत्य देऊन इ० स० १७४८ च्या जानेवारी महिन्यांत अबदाल्लीवर पाठविले. ह्या वेळी रोहिला अल्ली महमद हा सरहिंदचा सुभेदार होता व त्याजवळ वीस हजार सैन्य तयार होते. तेव्हां तो कदाचित् अबदाल्लीस वश होईल म्हणून बादशहाने त्यास रोहिलखंडाची सुभेदारी देऊन पुनः तिकडे पाठविले. इकडे अहमदशहा अबदाली आपणास रोहिल्यांचे साहाय्य मिळेल ह्या उद्देशाने सरहिंदपर्यंत चालून आला. तो त्याच सुमारास बादशाही सैन्य तेथे जाऊन पोहोचले. उभय सैन्यांची तेथे लढाई होऊन त्यांत कमरुद्दीनखान वजीर मारला गेला. परंतु त्याचा मुलगा मोईन-उल्मुल्क ऊर्फ मीरमनू ह्याने धैर्य न सोडतां सफदरजंगादि योद्धयांच्या मदतीने अबदालीचा पराभव केला. त्यामुळे तो