पान:अयोध्येचे नबाब.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रा.] मनसूरअल्ली सफदरजंग. rmmmmmmmmmmmmwww ह्याच्या मदतीने, खुद्द बादशहाकडून त्याजवर स्वारी करविण्याचा निश्चय केला. सफदरजंग याचें दिल्लीदरबारांत चांगले वजन होते, त्यामुळे त्याचा उद्देश तत्काळ सिद्धीस गेला. रोहिल्यांचा पुढारी अल्ली महमद हा इतका शिरजोर झाला की, त्याने बादशाही खंडणी देण्याचे अमान्य केले व दिल्लीदरबारांतून दिवाण हिरानंद म्हणून जो अंमलदार गेला होता त्याचे त्याने पारिपत्य केलें ; त्यामुळे त्याच्या अपराधाची आणखी भर पडली. महमदशहा बादशहा व त्याचा कमरुद्दीनखान वजीर ह्या उभयतांनी अयोध्येचा नबाब मनसूरअल्ली सफदरजंग व फरकाबादेचा नबाब काइमखान बंगष ह्या उभयतांची मदत घेऊन इ० स० १७४६ मध्ये रोहिल्यांवर स्वारी केली. रोहिल्यांची व बादशाही सैन्याची बाणगड येथे लढाई झाली. तीत त्यांचा फार पराभव होऊन सफदरजंगाचा दिवाण नवलराय ह्याच्या मार्फतीने त्यांचा पुढारी अल्ली महमह ह्याने तहाचे बोलणे लाविले. परंतु ह्या वेळी काइमखान बंगष ह्याने, मत्सरबुद्धीने, आपण होऊन, त्याची व बादशहाची मुलाखत करून दिली; आणि सफदरजंगाच्या इच्छेविरुद्ध त्याने त्याशी सख्य करून त्यास बादशहाकडून सरहिंद प्रांताचा सुभा देवविला. त्यामुळे काइमखान बंगष ह्याचे व सफदरजंग ह्याचे कायमचे वैमनस्य पडले. सर जॉन स्ट्रेची ह्यांनी आपल्या "रोहिला वॉर' नामक पुस्तकांत, अल्ली महमद ह्यास बादशहानें कैद करून दिल्लीस नेले व पुढे त्याच्या जातभाईच्या वजनामुळे त्यास सरहिंदचा सुभा देऊन मुक्त करणे त्यास भाग पडले म्हणून लिहिले आहे. ते जातभाई फरकाबादचे बंगष पठाण हेच असावेत. ह्याच पठाणांनी पुढे रोहिल्यांचा पक्ष घेऊन सफदरजंगास फार त्रास दिला. . _ अल्ली महमद शरण आल्यामुळे रोहिल्यांचे युद्ध कांहीं कालपर्यंत बंद राहिले व त्याबरोबर सफदरजंगाची इच्छा पूर्ण न होतां तीही