पान:अयोध्येचे नबाब.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रा.] सादतखान. घातल्याचे मिष केले. ह्यांपैकी पहिला सादतखानास दिला व दुसरा आपण घेतला. अर्थात् त्याचा परिणाम एकावर होऊन एक ह्या जगांतून नष्ट झाला व दुसरा राजकीय उलाढाली करण्यास पुनः कायम राहिला. ही गोष्ट एल्फिन्स्टनप्रभृति इतिहासकारांनी दिली आहे, परंतु तिच्या सत्यत्वाबद्दल वाद आहे. मि० बील ह्यांनी सादतखानाच्या मृत्यूची तारीख ९ मार्च इ० स० १७३९ ही दिली आहे. तिच्यावरून सादतखान हा नादिरशहाच्या दंगलीत मृत्यु पावला ही गोष्ट सिद्ध आहे. सादतखानाची कबर दिल्लीस आहे. सादतखान ह्यास फक्त एक कन्या होती. ती त्याने आपल्या भावाचा मुलगा महमद मुकीम ह्यास दिली होती. हाच पुरुष त्याच्या पश्चात् नबाब मनसूरअली सफदरजंग ह्या नावाने अयोध्येच्या गादीचा अधिपति झाला. सादतखान मृत्यु पावला तेव्हां त्याजवळ अतिशय संपत्ति होती. सर हेन्री लॉरेन्स ह्यांनी सादतखानाबद्दल असे लिहिले आहे की:-"त्याने इतकी संपत्ति मिळविली परंतु त्याने कोणावर जुलम केला नाही. उलट त्याने गरीबांचा प्रतिपाल चांगल्या रीतीने केला व धनिक लोकांपासून मात्र द्रव्य मिळविले. त्याने प्रमत्त झालेल्या जमीनदार लोकांची सत्ता कमी करून आपला एकछत्री अंमल बसविला. परंतु सदसद्विवेकशक्तीचा अंमल त्याच्यावर मुळीच नव्हता, स्वकुटुंबाचा उत्कर्ष हाच त्याचा मुख्य हेतु असल्यामुळे, त्याने तो सिद्धीस नेण्याचे कामी, कृतज्ञता, राजनिष्ठा अथवा देशाभिमान ह्या गुणांचा मुळीच विचार केला नाही. त्याचा स्वत:चा प्रांत सुरक्षित राहिला म्हणजे पुरे. मग इराणी अथवा मराठे ह्यांनी दिल्लीच्या साम्राज्याचा नाश केला तरी त्यास त्याची काळजी नव्हती. दिल्लीचा बादशहा बलहीन असल्यामुळे त्याने त्याशी नम्रपणाचे वर्तन ठेविलें