पान:अयोध्येचे नबाब.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग्छ बादशहा आपल्या डेऱ्यांत परत आला. इकडे सादतखानास झालेला वृत्तांत समजला व त्यास आपला इष्ट हेतु सिद्धीस गेला नाही असे पाहून पराकाष्टेचे वाईट वाटले. त्याने नादिरशहाची मुद्दाम भेट घेऊन त्यास असें सांगितले की, "दोन कोट रुपये म्हणजे कांहींच नव्हत. तेवढी रक्कम मी एकटा स्वतःच्या खाजगीतून देईन. खुद्द बादशहाजवळ व दिल्लीतील लोकांजवळ अगणित संपत्ति आहे. आपण तेथपर्यंत चला मात्र, की तेथें द्रव्याच्या राशीच्या राशी सांपडतील. दिल्ली शहर येथून* अब ४० कोस आहे." हे सादतखानाचें भेदक व गुप्त भाषण ऐकून नादिरशहास क्रोध उत्पन्न झाला. त्याने लगेच आपला पूर्वीचा विचार रद्द करून दिल्लीवर चाल केली. तेथे झालेली भयंकर कत्तल व अगणित लूट ह्यांचा वृत्तांत इतिहासवाचकांस पूर्ण अवगत असल्यामुळे त्याचे पुनर्विवेचन करण्याची आवश्यकता नाही. नादिरशहास निजामउल्मुल्क व सादतखान हे दोघेही वस्ताद आहेत असें वाटून त्याने दोघांसही कैद केले, व दोघांचाही छल करून त्यांच्याकडून सांपडेल तितकी संपत्ति लुटून घेतली. निजामउल्मुल्कानें सादतखानाचा समूळ नाश व्हावा एवढ्याकरितां, त्याजजवळ, " इतका अपमान झाल्यानंतर लाजिरवाणे जिणे चांगले नव्हे, त्यापेक्षां प्राण गेलेला बरा!" असे कपटप्रचुर शब्द उच्चारून उभयतांनी विषप्राशन करावे असा हेतु दर्शविला. सादतखान अगदी खिन्न व मरणप्राय झाल्यामुळे त्याने त्यास आपली अनुमति तेव्हांच दिली. निजामउल्मुल्काने विषाचे दोन पेले तयार करविले. त्यांपैकी एकांत खरें विष घातले व एकामध्ये नुसते विष

  • बादशहाची व नादिरशहाची भेट दिल्लीच्या उत्तरेस कर्नाल येथे झाली होती. तेथील ही हकीकत आहे.