पान:अयोध्येचे नबाब.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० अयोध्येचे नबाब. [भाग २ रा.] नाही. त्याने 'द्यावें तसे घ्यावे' ह्या न्यायाने ज्या कृति केल्या त्यांची फळे त्यास चांगली मिळाली. त्याच्या कर्तृत्वशक्तीमुळे व सुव्यवस्थित राज्यपद्धतीमुळे त्यास स्वतंत्र राज्य प्राप्त झाले, परंतु त्याच्या अप्रामाणिकपणामुळे त्यास अकालिक व अपकीर्तिकर मृत्यु प्राप्त झाला. तात्पर्य, जे दुसऱ्यास आपल्या कपटजालांत ओढण्याचा यत्न करितात ते स्वतःच फसतात, ह्या नियमात सादतखान अपवाद नव्हता." __ हे सर हेन्री लॉरेन्स ह्यांनी सादतखानासंबंधाने काढलेले उद्गार अगदी यथार्थ आहेत. सादतखान अयोध्या व लखनौ ह्या दोन ठिकाणी राहत असे. त्याने अयोध्या येथे एक किल्ला बांधला होता आणि लखनौ येथें लिकना नामक जो किल्ला होता तो दुरुस्त करून व त्यांत सुंदर राजवाडा बांधून त्यास 'मत्स्यीभवन' असें नांव दिलें होतें. हा किल्ला व त्यांतील राजवाडा अलीकडे पाडला गेला आहे. मत्स्य हे अयोध्येच्या नबाबाचे राजचिन्ह असून ते सादतखान शिरपेंचावर धारण करीत असे. ते कसे प्राप्त झाले हे वर सांगितलेच आहे. सादतखान ह्याचें चरित्र एकंदरीत बोधपर आहे.