पान:अयोध्येचे नबाब.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग wwwwwwwww त्यांनी आग्र्याचा रोख सोडून देऊन दिल्लीकडे मोर्चा वळविला व दिल्लीशहर जाळले असें मराठी इतिहासावरून दिसून येते. बाजीराव पेशव्यानी ह्या हकीकतीचे एक पत्र चिमणाजी आप्पास लिहिले आहे. ते महत्त्वाचे असून त्यांत सादतखानासंबंधाने लिहिलेला मजकूर वाचनीय आहे. बाजीराव लिहितात:-"सादतखानाचे युद्ध होऊन सरदार आलियाचे....वर्तमान कळलेच असेल. सादतखान यमुना उतरोन आगरियास आला. त्यासी गांठ घालावी तरी तो आगरियाचा आसरा करून राहिला. तेथे जाऊन युद्ध करावें तरी तो आश्रियाचा असतां मोडेल कळतच आहे! जरी गंभीर यमुनेच्या संगर्मी दिल धरून रहावे तरी........खळ्या फार. खानडवरा, महमदखान बंगस एक जालिया मनसबा भारी पडेल. याजकरितां संगमीं राहणे उत्तम नव्हे. दुसरे, सादतखानानी पादशहास व खानडवरा व कमरदीखान वगैरे अमिरांस लेहून पाठविले की, "मराठ्यांची फौज यमुना उतरोन आली होती ते बुडविली. दोन हजार स्वार मारिले, व दोन हजार नदीत बुडाले. मल्हारजी होळकर व विठोबा बुळे कामास आले. बाजीराव याची धाड आली होती तिची गत हे जाहली. त्याचे फौजेत बाकी राहिली नाही. आपण यमुना उतरोन मराठे बुडवून चमेली पार करितो.' म्हणून कित्येक गप्पा लिहून पाठविल्या. पादशहासी मजुरा करून घेतला. पादशहानी खुशाली करून सादतखानास वस्त्रे व मोत्यांची माळ व हत्ती व शिरपांव दिला, आपली बाजू सर करून घेतली.........तात्पर्यार्थ, आमचे फौजेत जीव नाही ; केवळ निर्जीव ; बुडवून नेस्तनाबूत केली असे लिहीत. मोंगली कारभार आपण ऐकत जाणतच आहेत. करावें थोडें, लिहावें फार. पादशहास सत्य भासलें तें मिथ्या केले पाहिजे. त्याचे विचार दोन. एक सादतखानास बुडवावें, किंवा दिल्लीचें पूर जाळावे;