पान:अयोध्येचे नबाब.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रा.] सादतखान. शाहतीचा व मुसलमानी धर्माचा कांही अभिमान असेल तर ह्या वेळी त्या जमीनदाराची खोड मोडावी अशी त्यास आग्रहाची विनंति केली. सादतखानाने तीस मान देऊन त्या जमीनदाराशी स्वतः युद्ध केले व त्यास आपल्या शरसंधानाने चीत करून त्यास हस्तगत केले. त्याने त्याचे शीर बादशहास नजर पाठवून, धड वजीर कमरुद्दीनखान ह्यास बक्षीस केले. त्याने स्वतः ता० १२ नोव्हेंबर इ० स० १७३५ रोजी बादशहाची भेट घेतली आणि त्यास १००९ मोहरा नजर करून त्यास एक सुंदर तलवार अर्पण केली. सादतखानाच्या रणशौर्याने बादशहास फार समाधान वाटून त्याने त्यास एक बहुमूल्य झगा, रत्नखचित तलवार, एक घोडा व एक हत्ती बक्षीस दिला. ह्याप्रमाणे बादशहाची त्याजवर फार मेहेरबानी जडली होती. महमदशहाच्या कारकीर्दीमध्ये मराठे अधिक अधिक प्रबल होऊन उत्तरेकडील प्रांत काबीज करीत होते. त्या वेळी बादशाही वजिरांमध्ये व निरनिराळ्या सुभेदारांमध्ये मत्सर व द्वेष फार वाढला असल्यामुळे ह्यांस अधिक अधिक प्रवेश करण्यास संधि मिळत असे. ह्या वेळी मराठ्यांच्या गादीवर छत्रपति शाहूमहाराज हे असून त्यांचे प्रधानपद थोरले बाजीराव पेशवे यांजकडे होते. त्यांना मराठी राज्याचा झेंडा सर्व हिंदुस्थानभर फडकविण्याची महत्त्वाकांक्षा व उमेद होती. त्यांनी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर व पिलाजी जाधव ह्या शूर सरदारांस बरोबर घेऊन उत्तरेकडे स्वाऱ्या केल्या. त्या वेळी मराठ्यांचा मोहरा मागे हटविण्याकरितां सादतखान ह्याने कित्येक वेळां त्यांच्याशी चांगल्या लढाया केल्या व मराठ्यांस पुष्कळ अडथळा केला. थोरले बाजीराव ह्यांनी इ० स० १७३६ मध्ये जी दिल्लीवर स्वारी केली, त्या वेळी सादतखान आग्र्यास असन तो प्रबळ होता व त्याचा पराभव करणे बरेच कठीण होते. म्हणन