पान:अयोध्येचे नबाब.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग सादतखान हा राजकारणपटु व धूर्त असल्यामुळे त्याने अकबराबाद सुभ्याचा चांगला बंदोबस्त केला. त्याने तेथील हिंदुप्रजेशी मिळून मिसळून वागून सर्व दंगेधोपे नाहीसे केले, व देशांत शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला. आग्रा येथे त्याचा राय नीलकंठ नागर म्हणून एक हिंदु दिवाण होता. तो फार हुशार असल्यामुळे त्याने स्वतःस अयोध्येची सुभेदारी मिळाल्यानंतर त्यास आपल्या वतीने आग्र्याच्या सुभ्यावर नेमिले. परंतु राय नीलकंठ ह्यांस तेथील एका जमीनदाराने लवकरच ठार मारिलें. त्यामुळे दिल्लीचा वजीर खानदौरान ह्याने राजा अजीतसिंग ह्यास आग्र्याचा सुभेदार केले. सादतखान अयोध्येचा सुभेदार झाल्यानंतर दिल्लीदरबारांत अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या. त्या सर्वांमध्ये त्याचे अंग असे. तो वारंवार दिल्ली येथें बादशहाच्या मुलाखतीस व राजकारणप्रसंगास जात असे. दिल्लीचे प्रमुख वजीर खानदौरान, व कमरुद्दीनखान ह्यांचे व त्याचे चांगले रहस्य होते. त्यामुळे ते वेळोवेळी राजकारणांत त्याची सल्लामसलत व साहाय्य घेत असत. इ० स० १७३४-३५ मध्ये कोरा प्रांताच्या जमीनदाराने प्रमत्त होऊन तेथील सुभेदार जाननिसरखान ह्याच्या विरुद्ध बंड केले व दिल्लीहून त्याच्या मदतीस गेलेल्या सरदारास तो आटोपेनासा झाला. त्या वेळी वजीर कमरुद्दीनखान ह्याने सादतखानास मदतीस बोलाविलें व बाद - - ध्येचा सुभेदार नेमिलें असें म्हणतात. मि. बील हे इ० स० १७२४ मध्ये राजा गिरिधराच्या मागून सादतखान यास अयोध्येची सुभेदारी दिली असे लिहितात व 'सियारउल्मुताखरीन' ग्रंथामध्ये त्यास आधार सांपडतो. त्यावरून प्रारंभी इ० स० १७२० मध्ये सादतखान ह्यास आग्रा उर्फ अकबराबाद येथील सुभा मिळाला व मागाहून इ० स० १७२४ मध्ये अयोध्येची सुभेदारी मिळाली असे दिसते.