पान:अयोध्येचे नबाब.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रा.] सादतखान.. इच्छा असल्यामुळे त्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकांस अनुकूल करून घेतले होते. त्यामुळे बादशहाचे व अबदुल्लाखानाचें दिल्ली व आग्रा ह्यांच्या दरम्यान युद्ध झाले. त्यांत अबदुल्लाखानाचा पराभव होऊन त्यास अनेक जखमा लागल्या व शेवटी तो बादशहाच्या कैदेत सांपडून लवकरच मृत्यु पावला. ही गोष्ट इ० स० १७२०-२१ मध्ये घडली. महमदशहास विजय प्राप्त झाल्यामुळे दिल्लीच्या लोकांस फार आनंद झाला व त्यांनी बादशहाचा नगरांत प्रवेश होतांच आनंदोत्सव करून त्यावर सुवर्णपुष्पं व मौक्तिकें उधळिली. बादशहासही विशेष संतोष झाला व त्याने आपणास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कामी मदत केलेल्या लोकांचे उपकार मानून त्यांचा योग्य गौरव केला. त्या वेळी त्याने चिनकिलिचखान ह्यास 'असफजहा' असा किताब दिला व त्याच्या बरोबरीने ज्याने उत्कृष्ट साहाय्य केलें तो दुसरा इसम महमद अमीन ऊर्फ सादतखान ह्यास 'बहादुरजंग बहाणउल्मुल्क' अशी पदवी दिली, आणि त्याच्या पराक्रमाबद्दल एक मत्स्यचिन्ह सादर केले. 'सियारउल्मुताखरीन' ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, मोंगल लोकांमध्ये तरवारबहादुरीचे मुख्य चिन्ह मासा हे असे. ते ज्यास मिळे त्याच्या वीर्यशालित्वाची सीमा झाली असें मानीत असत. त्याप्रमाणे पाहिले तर सादतखान ह्याने आपले पराक्रमतेज चांगलेच व्यक्त केले असावे असें सिद्ध होते. महमदशहाने सादतखान ह्यास नुसतें महत्पद देऊन संतुष्ट केले नाही, तर त्यास ह्याच वेळी म्हणजे इ० स० १७२० मध्ये आग्र्याचा सुभेदार केले व पुढे काही वर्षांनी म्हणजे इ० स० १७२४ मध्ये अयोध्येचा सुभेदार नेमिलें.*

  • सादतखान ह्यास अयोध्येचा सुभेदार कोणत्या साली नेमिलें याबद्दल बरीच शंका आहे. मि. आयर्विन हे सादतखान ह्यास इ० स० १७२० मध्ये अयो.