पान:अयोध्येचे नबाब.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[भाग wwwww ramaniawwaima अयोध्येचे नबाब. लवृत्ति असल्यामुळे त्यास यश न येऊन तो व्यर्थ प्राणांस मात्र मुकला. सय्यदबंधूंनी फरुखसियर बादशहाचा वध केल्यानंतर दिल्लीच्या गादीवर रफिउद्दरजात व रफिउद्दवला अशा दोन अल्पचयी मुलांस अनुक्रमें संस्थापित केलें, परंतु ती अल्प काळांत मृत्यु पावली. तेव्हां त्यांनी रोषनअखत्यार ह्यास महमदशहा हे नांव देऊन दिल्लीच्या तक्तावर आरूढ केले. अशा रीतीने दिल्लीदरबारांत एकसारखी राजक्रांति सुरू होऊन सय्यदबंधूंची सत्ता अमर्यादित झाल्यामुळे सर्व लोकांस त्यांचा तिरस्कार वाढू लागला आणि प्रांतोप्रांती बंडें उत्पन्न होऊ लागली. तीन बादशहांची जी दुर्दशा झाली तशीच महमदशहाची होणार असे समजून त्याच्या चतुर आईर्ने सय्यदबंधूंचा निःपात करण्याचा विचार चालविला. एकंदर अमीर उमराव व इतर दरबारी लोक सय्यदबंधूंच्या विरुद्ध झाल्यामुळे हा विचार सिद्धीस नेण्यास फारशी अडचण पडली नाही. ह्या कामा सादतखान ह्याने महमदशहास व त्याच्या आईस योग्य सल्लामसलत देऊन दिल्लीदरबारांतील सूत्र बिघडू दिले नाही. चिनकिलिचखान जो पुढे निजामउल्मुल्क या नांवानें इतिहासप्रसिद्ध झाला तो ह्या वेळी माळव्याचा सुभेदार होता. त्याने बंड करून अशीरगड व ब-हाणपूर ह्या बळकट जागा बळकाविल्या व सय्यदबंधूंचे सेनापति दिलावरखान व अलमअल्ली यांना ठार मारिलें. ही बातमी समजतांच सय्यदबंधूंनी त्याचा पराभव करण्याकरितां बादशहासह एकाने तिकडे जार्वे व एकानें दिल्लीस रहावे असा निश्चय केला. इतक्यांत सय्यद हुसेनअल्ली ह्याचा पालखीमध्ये आकस्मिक खून झाला. त्यामुळे सय्यदअबदुल्ला ह्यास, त्यांत महमदशहाचे अंग आहे असे वाटून, स्याने दुसरा एक नवीन बादशहा गादीवर बसवून महमदशहावर चाल केली. महमदशहास सय्यदबंधूंच्या प्रतिबंधांतून मुक्त होण्याची