पान:अयोध्येचे नबाब.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग इ० स० १२२६ मध्ये मलिक नासिरुद्दीन हा अयोध्येचा अधिपति होता व त्याने भार लोकांचे वर्चस्व कमी करून त्यांना दाबांत ठेविलें होतें. इ० स० १२४३ मध्ये दिल्लीपति अल्लाउद्दीन ह्याने आपला चुलता नासिरुद्दीन ह्यास अयोध्या प्रांतांतील बाहरैच येथील सुभेदार नेमिलें. त्याने तेथे शांतता ठेवण्याचा यत्न करून तेथील प्रजेची स्थिति सुधारली. ह्याच्या कारकीर्दीत बाहरैच प्रांताचा चांगला उत्कर्ष झाला. हाच नासिरुद्दीन पुढे दिल्लीचा बादशहा झाला व ह्याने दाल व बाल ह्या भार लोकांच्या अधिपतींचा इ० स० १२४६ मध्ये पराभव केला. त्याचा उल्लेख वर केलाच आहे. परंतु ह्याबद्दल बराच संशय आहे. इ० स० १२८० मध्ये अयोध्येवर एक सुभेदार नेमिला होता असा उल्लेख सांपडतो, परंतु त्याचे नांव समजत नाही. तात्पर्य, इ० स० १३५० पर्यंत अयोध्येमध्ये मुसलमानांचे विशेष प्राबल्य नव्हते. त्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या अविधसत्तेच्या लाटांबरोबर मुसलमानांची वस्ती वाढत चालली व विशेषेकरून हरदुई, लखनौ, बाराबंकी व फैजाबाद येथे त्यांचा भरणा विशेष झाला. अयोध्येच्या सुभ्याची माहिती अकबर बादशहाच्या कारकीर्दीपासून कांहींशी विश्वसनीय समजते. अकबराने इ० स० १९९० मध्यें हिंदुस्थानचे एकंदर बारा सुभे केले. त्यांत अयोध्या ऊर्फ औध हा एक सुभा केला. त्या वेळी ह्या सुभ्याची चतुःसीमा आतांप्रमाणे नसून त्यांत गौरखपूर जिल्ह्याचा समावेश होत होता, व फैजाबादेचा बहुतेक भाग त्यांत अंतर्भूत होता. अबुलफजल ह्याने आपल्या 'ऐनेअकबरी' ह्या ग्रंथांत, अयोध्येच्या सुभ्याची लांबी, सरकार गोरखपुरापासून सरकार कनोजपर्यंत १३५ कोस, आणि रुंदी सिद्दीपुरापासून अलहाबादच्या सुभ्यापर्यंत ११५ कोस अशी दिली आहे. ह्या वेळी सुभेदार वारंवार बदलत असल्यामुळे