पान:अयोध्येचे नबाब.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ला.] अयोध्या-देशस्वरूप व प्राचीन माहिती. wwwwwwww त्यास ता० २० रजब ४२४ हिजरी म्हणजे ता० १४ जून इ० स० १०३३ ह्या रोजी, आपल्या तीव्र बाणानें गतासु केले, आणि त्याच्या खाशा सैन्याचा वध केला. ह्या युद्धामध्ये अयोध्येच्या हिंदु राजास यश आल्यामुळे ते काही काल-सुमारे १६० वर्षे–पर्यंत यवनसत्तेच्या ताब्यात न जातां स्वतंत्र राहिले. परंतु पुढे शहाबुद्दीन घोरी ह्याने इ० स० ११९३ मध्ये सर्व प्रदेश पादाक्रांत करून दिल्लीच्या सिंहासनावर कुतुबुद्दीन ऐबक ह्यास अधिष्ठित केल्यानंतर अयोध्येसही अविंधसत्तेचा स्वीकार करणे भाग पडले. सय्यद सालर मसाउद ह्याचा सात्रिक येथे एक दरगा असून तेथे अद्यापि प्रतिवार्षिक यात्रा भरत असते. हा फार थोर पुरुष होता अशी प्रसिद्धि असल्यामुळे त्याच्या दरग्याच्या दर्शनास सुलतान महमद तघलक याची स्वारी इ० स० १३४० मध्ये गेली होती. ह्याने रदौली येथील एका तेल्याच्या मुलीशी लग्नकरण्याचा निश्चय केला होता म्हणून अद्यापि तेथील लोक त्या यात्रेस जात असतात. मुसलमान लोकांस हा पुरुष फार पूज्य असून, अयोध्येचे मुसलमान आपला उगम सय्यद साकर ह्याच्या वेळेपासून आहे अशी बढाई मारीत असतात. सय्यद सालर मसाउद ह्याच्या स्वारीपासून सादतखान ह्यास अयोध्येची सुभेदारी मिळेपर्यंत म्हणजे स्थूलमानानें इ० स० १०३० पासून इ० स० १७२४ पर्यंत-अयोध्येच्या इतिहासाची खात्रीलायक माहिती मुळीच उपलब्ध नाही. ह्या प्रांतांतील लोकांमध्ये अनेक दंतकथा प्रचलित आहेत; परंतु त्या विसंगत व अविश्वसनीय असल्या. मुळे त्यांचा इतिहासास यत्किंचितही उपयोग नाही. मुसलमान इतिहासकारांनी काही गोष्टी लिहिलेल्या कचित् स्थळी सांपडतात; परंतु त्याही अपूर्ण व निरनिराळ्या प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध न झालेल्या अशाच आहेत. तथापि त्यांतील स्थूल माहितीवरून असे दिसून येते की,