पान:अयोध्येचे नबाब.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. नेरी' ह्या फ्रेंच नांवाचे भाषांतर आहे. ही इमारत क्लाड मार्टिन म्हणून एक फ्रेच पुरुष अयोध्येचा नबाब सुजाउद्दौला ह्याचे कारकीर्दीत आला होता त्याने बांधली आहे. हा पुरुष फार साहसी व बुद्धिवान् होता. हा शिल्पकलेत निष्णात असून ह्याने हिंदुस्थानांत पहिल्यानेच विमान उडविले होते. ह्याजवर सुजाउद्दौल्याची मर्जी जडल्यामुळे त्याने त्यास आपल्या राज्यांत नेउन दारूगोळा व शस्त्रास्त्रे ह्यांच्यावरील मुख्य अधिपति केले होते. सुजाउद्दौल्याच्या मृत्यूनंतर अयोध्येस ज्या राजकीय उलाढाली झाल्या त्यांत ह्याने आपला उत्कर्ष करून घेउन विपुल धन संपादन केले. असफउद्दौल्याच्या कारकीर्दीत हा इतका धनसंपन्न बनला की, ह्याने निरनिराळ्या पेढ्या घातल्या व अयोध्येच्या लोकांबरोबर देण्याघेण्याचा व्यापार करूं लागला. त्यामुळे त्याची संपत्ति वाढत चालली.. ह्याने 'फरहतबक्ष' व ला मार्टिनेरी अशा दोन सुंदर इमारती बांधल्या. ह्यांपैकी पहिली इमारत असफउद्दौल्याने विकत घेतली व दुसरीही विकत घेण्याकरितां त्याने १० लक्ष रुपये देण्याचे कबूल केले; परंतु ह्या फ्रेंच गृहस्थाने ती विकत दिली नाही. त्याने आपल्या पश्चात् ह्या इमारतीचा व द्रव्याचा विनियोग शिक्षणाकडे करावा अशा उद्देशाने एक मृत्युपत्र करून ठेविलें व ज्योसेफ क्युरोस नामक एका गृहस्थास त्याची सर्व व्यवस्था सांगितली. हा पुरुष ता० १३ सप्तंबर इ. स. १८०० मध्ये मरण पावला. त्याचे प्रेत ह्या इमारतीतील एका भागामध्ये पुरले आहे. क्लाड मार्टिन ह्याच्या पश्चात् त्याच्या इच्छेप्रमाणे येथे एक विद्यालय संस्थापित होऊन ते अद्यापि चालत आहे. क्लाड मार्टिन ह्याने बांधलेली इमारत भव्य असून तिची रचना सशास्त्र आहे. हिचे आंतील नक्षीकाम व निरनिराळे दिवाणखाने प्रेक्षणीय असून त्यांत विविध चित्रं काढली आहेत. हिच्या शिरोभागी मोठमोठे सिंह काढले असून अगर्दी अत्युच्च शिखरांवर मनुष्याकृति पुतळे उभे केले आहेत. त्या सर्वांवर प्रस्तुत "युनियन जैक " हे निशाण फडकत असते. या इमारतीचे पुढील भार्गी एक सुंदर कृत्रिम तलाव असून त्याच्या मध्यभागी १२३ फूट उंचीचा एक स्तंभ आहे. इ.स. १८५७ च्या बंडामध्ये बंडवाल्यांनी ह्या इमारतीच्या आतील कित्येक दर्शनीय वस्तूंचा नाश केला व क्लाड मार्टिन ह्याचे थडगे छिन्नविच्छिन्न करून त्याच्या