पान:अयोध्येचे नबाब.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखनौ. काही दिवस येथे येऊन राहत असे. ह्या राजवाड्यासभोवती त्याने एक विस्तीर्ण क्रीडावन केले असून तेथें तो मृगया करीत असे. त्याकरिता त्याने हरिणे व अनेक वन्यपक्षी ठेविले होते. विशेषेकरून उष्णकालामध्ये तो आपल्या अंतःपुरासहवर्तमान येथे येऊन वसंतविलास करीत असे. ह्या राजवाड्यासंबंधाने एका आंग्लकवीनें पुढील वर्णन केले आहे: “A country seat where Kings of Oudh of yore Fled city heat with their barbaric court, Encircled by a park where Eastern dames Screened from strange eyes indulged in listless sport.” ___ ह्यावरून ह्या उपवनप्रासादाची वाचकांस कल्पना करितां येईल. येथेच विमानोड्डाण वगैरे शास्त्रीय प्रयोग केव्हां केव्हां होत असत. इ० स० १८३० मध्ये एका इंग्रज गृहस्थाने येथून एक विमान उडविले, त्या वेळी लखनौचा नबाब नासिरउद्दीन हैदर व त्याचे सर्व दरबारी लोक येथे जमले होते. दिलखुष राजवाडा इ० स० १८५७ च्या बंडामध्ये बंडवाल्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता, परंतु सर कोलिन क्यांपबेल ह्यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यांत आला. नंतर अयोध्येच्या इंग्रजी सैन्याचे अधिपति ह्यांनी येथे आपलें निवासस्थान केले होते. ह्या राजवाड्यामध्ये सुप्रसिद्ध इंग्रज सेनापति सर हेन्री हव. लॉक हे ता० २४ नोव्हेंबर इ० स० १८५७ रोजी मृत्यु पावले. सांप्रत ह्या राजवाड्याचे पूर्वस्वरूप राहिले नसून त्यांत आंग्लाभिरुचीप्रमाणे फेरफार केले आहेत व त्याच्या सभोवती सुंदर पुष्पवाटिका व लतामंडप केले आहेत. यामुळे त्याचे रूक्ष स्वरूप बदलले जाऊन तो एक नयनानंददायक दृग्विषय होऊन राहिला आहे, व त्याचे 'दिलखुषप्रासाद' हे नांव सार्थ वाटत आहे. ला मार्टिनेरी कॉलेज. लखनौंतील प्रेक्षणीय व भव्य इमारतींपैकी ला मार्टिनेरी ही एक इमारत आहे. हिला 'कान्स्टंशिया' अथवा 'मार्टिनकोठी' अशी ही दोन नावे आहेत. पैकी पहिले नांव, या कॉलेजचे “Labour et constantia" (श्रम आणि सततउद्योग ) ह्या आदर्शवाक्यावरून पडले आहे. दुसरे नांव, ‘ला मार्टि