पान:अयोध्येचे नबाब.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखना. अस्थी फेंकून दिल्या. परंतु बंडाची समाप्ति झाल्यानंतर त्यांची पूर्ववत् व्यवस्था झाली. ह्या इमारतीमध्ये काड मार्टिन ह्याच्या बुद्धिचातुर्याच्या दर्शक अशा काही वस्तु अद्यापि दृष्टीस पडतात. ह्या इमारतीच्या मध्यभागी एक प्रचंड घंटा टांगलेली आहे. ती जनरल क्लाड मार्टिन ह्याने इ. स. १७८६ ह्या वर्षी तयार केली होती. त्याचप्रमाणे ह्या इमारतीच्या पश्चिमेकडील उद्यानभूमीमध्ये एक पितळी तोफ आहे. ती ह्याच पुरुषाने तयार केली असून, तिच्या साहाय्याने लॉर्ड कॉर्नवालिस ह्यांनी इ० स० १७९२ साली श्रीरंगपट्टगावर हल्ला केला व टिपू सुलतानास पराभूत करून तेथें विजयध्वज लाविला. हिच्यावर " लॉर्ड कॉर्नवालिस” अशी अक्षरे लिहिली आहेत. ही तोफ क्लाड मार्टिन ह्याच्या स्मारकार्थ, गव्हरनर जनरल लॉर्ड नॉर्थब्रूक ह्यांच्या परवानगीनें, ह्या कॉलेजाच्या उद्यानभूमीमध्ये, मुद्दाम आणून ठेविली आहे. ती पाहून प्रेक्षकांस क्षणभर विस्मयानंद वाटून क्लाड मार्टिन ह्याच्या बुद्धिकौशल्याचे अभिनंदन केल्यावांचून राहवत नाही. ला मार्टिनेरी ह्या प्रचंड इमारतीचे अवलोकन केले म्हणजे आंग्लकवीने उद्गत केलेले पुढील विचार मनात येतात “Tis said that memory is life, And that, though dead, men are alive. Removed from sorrow, care, and strife, They live because their works survive. लाल बारद्वारी. ही इमारत लखनौचा नवाव सादतअल्लीखान ह्याने बांधली आहे. ही सर्व तांबड्या दगडांची असल्यामुळे हिला 'लाल बारद्वारी' असे नाव पडले आहे. आग्रा व दिल्ली येथे मुमताजउद्दौला आणि दिवाण-इ-आम म्हणून ज्या प्रसिद्ध लालरंगाच्या इमारती आहेत त्यांची बरोबरी करण्याच्या उद्देशाने ही इमारत वांधली आहे. येथे नवीन नवावास राज्याभिषेक करण्याचा परिपाठ असे, म्हणून या इमारतीस 'राज्याभिषेकप्रासाद' असें नांव मिळाले आहे. इंग्लडमध्ये