पान:अयोध्येचे नबाब.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ર स्थलवर्णन. ... स्कऱ्यांचा हास्यरसोत्पादक विनोद ह्यांवांचून दुसरे काही नसावें ह्यांत आश्चर्य ते काय? येथील देखाव्याचे चित्र एका महाराष्ट्रकवीच्या वाणीने अधिक चांगले लक्ष्यांत येण्यासारखे आहे. साक्या. लगबग लगबग साज करोनी वारवधू मग आली। संगें तबला सारंगीही घेउनि आपुली आली ।।१॥ अवयव सकलहि बघुनि म्हणती नासा जैसी। शुकनासा ही भ्रूवल्लीही कामधनुर्ध्या तैसी ॥२॥ चंद्रवदन मृदु कुंदरदनही करकिसलय मृदु हाले । नयनमीन हे हृदयकदन जणुं मदनचि मारी भाले ॥ ३ ॥ ख्याल, ध्रुपदें, ठुमऱ्या, प्रबंध गाते तरणे।। अभिनव अभिनय पाहुनि होती वृद्ध समाजहि तरणे ॥ ४ ॥ - असो. कैसरबाग राजवाडा सांप्रत आपल्या पूर्ववैभवास मुकला असून सर्व जगास अनाचारदुष्परिणामाचे चित्र आपल्या दीन स्वरूपाने दाखवीत आहे. इ. स० १८५७ च्या बंडाच्या वेळी ह्याचा बराच नाश झाला, म्हणून त्यावर दया करून ब्रिटिश सरकाराने त्यास अयोध्येच्या तालुकदारांच्या स्वाधीन केले आहे. लेफ्टनंट गव्हरनर, व्हाईसरॉय वगैरे बड्या अधिकाऱ्यांच्या सत्कारार्थ येथे केव्हां केव्हां दरबार भरत असतात, व त्याच प्रसंगी रोषनाई व आतषबाजी ह्यांचीही शोभा दृष्टीस पडते. ह्या राजवाड्याचे बांधकाम इ. स. १८५० मध्ये पुरे झाले असून ह्यास सुमारे ८० लक्ष रुपये खर्च लागला असे म्हणतात. वाजिदअल्लीशहा हा इ० स० १८५६ मध्ये पदच्युत झाल्यामुळे त्याने फक्त ६ वर्षेच त्याचा उपभोग घेतला असावा असे दिसते. दिलखुषप्रासाद. दिलखुषप्रासाद हे लखनौतील दर्शनीय स्थलांपैकी एक उत्कृष्ट स्थळ होय. हा राजवाडा सादतअल्लीखान ह्याने आपल्या कारकीर्दीत (इ. स. १७९७-इ० स० १८१४) वनगृह म्हणून बांधिला होता. येथे कृत्रिम सौंदर्यापेक्षां सृष्टिसौंदर्य विशेष आहे. येथील वनश्रीचा उपभोग घेण्याकरितां नबाव सादतअल्लीखान हा वर्षातून