पान:अयोध्येचे नबाब.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_अयोध्येचे नबाब. [भागः टक्कर देऊन अद्यापि जीवमान राहिली आहेत. अयोध्येच्या दक्षिण, भामांत क्षत्री लोकांची जी वसाहत झाली तिचा काल हाच असावा, असा अदमास आहे. । अयोध्याप्रांतावर मुसलमानांची पहिली स्वारी गझनीचा प्रसिद्ध मुलतान महमूद ह्याचा भाचा सय्यद सालर मसाउद गाझी याने केली. ह्या स्वारीचे वर्णन 'मीरत-इ-मसाउदी' ह्या पुस्तकांत अबदुल रहिमान चिस्ती ह्या ग्रंथकारानें, खुद्द सालर मसाउद याच्या स्वारीत हजर असलेल्या कोणी मुल्ला महमद गझनवी नामक सरदाराच्या जुन्या माहितीवरून लिहिले आहे. मुसलमानी इतिहासग्रंथांचे प्रकाशक सर हेन्री इलियट ह्यांनी हा ग्रंथ एक 'ऐतिहासिक कादंबरी' आहे असे म्हटले आहे. परंतु जनरल कनिंगह्याम ह्यांचे मत असे आहे की, ह्याच ग्रंथावरून अयोध्येच्या इतिहासाची काहीशी व्यवस्थित माहिती मिळते. सय्यद सालर मसाउद ह्याचें चरित्र फार विस्तृत आहे, परंतु ते येथे देण्याचे कारण नाही. हा गझनीच्या महमुदाचा मेहुणा व सेनापति सय्यद साहू ह्याचा मुलगा असून, आपल्या बापाच्या बरोबर अनेक युद्धप्रसंगांत हजर असल्यामुळे युद्धकलाविशारद झाला होता. त्यास सुलतान महमूद ह्याने अयोध्याप्रांत सर करण्याकरितां पाठविले होते. खुद्द सुलतान महमूद कनोजपर्यंत स्वाऱ्या करून आला होता, परंतु अयोध्या प्रांत त्याच्या ताब्यांत आला नाही. सय्यद मसाउद ह्याशी अयोध्येतील लहान लहान राजे ह्यांनी प्रथमतः सलोख्याचे वर्तन केले, परंतु त्यास पादाक्रांत करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अनावर झाल्यामुळे त्याने त्यांशी युद्ध करण्याचा बेत केला. त्या वेळी अयोध्येच्या सर्व संस्थानिकांस विशेष स्फुरण येऊन त्यांनीही त्याच्याशी टक्कर देण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांच्या व त्याच्या अनेक लढाया झाल्या. अखेर सोहलदेव नामक साहेतमाहेत येथील राजाने त्याशी निकराचे युद्ध करून