पान:अयोध्येचे नबाब.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखनौ. २ इ-आराम' ( Heavenly Garden) आणि 'दर्शनविलास' (Pleasing to the sight ) अशा दोन रम्य इमारती नासिरउद्दीन ह्याने आपणा स्वतःकरितां बांधिल्या होत्या. त्यांतही सांप्रत युरोपियन अधिकाऱ्यांच्या कचेऱ्या आहेत. कैसरबाग. कैसरबाग राजवाडा हा लखनौचा शेवटचा नबाब वाजिदअलीशहा ह्याने बांधिला. ह्याच्या इतका प्रचंड व विस्तृत राजवाडा इमामवाड्याशिवाय दुसरा एकही नाही. वाजिदअलीशहा हा व्यसनासक्त व शंगारविषयलंपट असल्यामुळे ह्याने आपल्या वारांगनांकरितां या राजवाड्यांमध्ये निरनिराळे महाल तयार केले होते, व ते उत्तम प्रकारे सुशोभित करून तेथें विलासांची सीमाच केली होती. जुन्या कादंबऱ्यांतून अत्तराचे दीप आणि गुलाबपाण्याची कारंजी ह्यांचे वर्णन आढळते, परंतु येथे ती प्रत्यक्ष वसत असत. वाजिदअल्लीशहा ह्याच्या प्रिय ललना ३६० असून त्यांच्या ह्या राजवाड्यामध्ये विविधलीला चालत असत. खुद्द यजमानसाहेवांकरितां'चांदीवाली बारद्वारी' व 'खासमुकाम' असे दोन महाल ह्या राजवाड्यामध्ये निराळे असत. ते रुप्याने व सुवर्णाने मढविलेले असून त्यांची फरसबंदीही रुप्याचीच असे. या बहुविध अंतःपुरांसभोवती लहान लहान पुष्पवाटिका केल्या असून त्यांतून सदैव सुगंधशीतल वायूच्या लहरी येत असत. ह्याच राजवाड्यामध्ये चिनीबाग, हजरतबाग वगैरे जी उद्याने होती ,तेथें नेत्रांचे समाधान होण्याकरितां नानात-हेचे पुतळे, विविध देशांतील मनोहर चित्रे, आणि हरिणे, मयूर वगैरे पशुपक्षीही ठेविले असत. तात्पर्य, मृच्छकटिक नाटकांत वसंतसेनेच्या वाड्याचे वर्णन केलें आहे ते येथे प्रत्यक्ष अवलोकन करण्यास मिळत असे. येथे सदोदित कर्णमनोहर वाद्यरव आणि सुस्वर संगीत ऐकू येत असे. वाजिदअल्लीशहा ह्याचा दरवार चतुर मुत्सदी, रणशूर सेनापति किंवा विद्वान् पंडित ह्यांचा नसून यौवनसंपन्न विलासिनी, संगीतशास्त्रीनपुण गवई आणि रंगेल खुषमस्करे ह्यांचाच असल्यामुळे, तेथें गहन राजकारणे किंवा शस्त्रांचा खणखण आवाज, किंवा विद्वानांचें पांडित्य ऐकू न येतां, तेथें गवयांचे मधुर आलाफ , स्त्रियांचे नेत्रकटाक्ष, आणि खुषम