पान:अयोध्येचे नबाब.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. खरोखर रसिक व मर्मज्ञ पाश्चात्य लोक जिचे इतकें स्तुतिस्तोत्र गातात तिच्या सौंदर्याची कल्पना प्रत्यक्ष दर्शनावांचून होणे शक्य नाही. छत्तरमंझील. इमामवाड्याखालोखाल दुसरें प्रेक्षणीय मंदीर 'छत्तरमंझील' हे होय. छत्तरमंझील हे नांव पडण्याचे कारण ह्या इमारतीच्या शिरोभागाचा वर्तुलाकार व छत्रीसारखी रचना ही होत. ही सुंदर इमारत नासिरउद्दीन हैदर ह्याने आपल्या अंतःपुरांतील प्रिय ललनांकरितां बांधली असून तिचे सर्व काम स्त्रीजातीच्या सौकुमार्यास शोभेल असेंच नाजूक व मनोहर केले आहे. ह्या इमारतीचे दोन भाग असून त्यांच्यामध्ये एक रमणीय क्रीडोपवन होते, व त्यांत एक संगमरवरी पाषाणाचे तयार केलेले मनोल्हादक सुंदर जलाशय होते. त्यामध्ये छत्तरमंझी. लाची सुवर्णप्रभा प्रतिबिंबित होऊन ती त्या उद्यानास अत्यंत शोभा देत असे. ह्या राजमंदिरामध्ये कांचचे सामान चित्रविचित्र रंगाचे असून त्याने त्यांतील निरनिराळे रंगमहाल अलंकृत केले होते. येथे सदैव चारुतर रमणींच्या बहुविध लीला चालत असत. ह्या राजवाड्यासभोवती खोजे लोकांचा सक्त पाहरा असून पुरुषवर्गाचा तेथे कधीही प्रवेश होत नसे. खुद्द नबाबसाहेबांची स्वारी जवळच्या "फरहतवक्ष” नामक राजवाड्यांत राहत असून फक्त विलाससुख घेण्याकरितां ह्या राजवाड्यांत येत असे. ह्या चित्ताकर्षक इमारतीचे दर्शन घेऊन अनेक आंग्लस्त्रिया हर्षभरित होतात व तिच्या रम्य स्वरूपाची आपल्या कोमल वाणीने फार फार प्रशंसा करीत असतात. ऑनरेवल मिस इडन ह्या आंग्लयुवतीने आनंदभराने असे उद्गार काढिले आहेत की " Such a place ! the only residence I have coveted in Indian Don't you remember reading in the Arabian Nights Zobeide bets her Garden of Delight amidst the Califa’s Palace of Pictures, I am sure this was the Garden of Delight." अर्थात् अरेबियन नाइट्स मधल्या झोबीडच्या आनंदवनाची ज्यास उपमा मिळते त्याचे वर्णन शब्दांनी अधिक काय लिहावें ! ह्या राजवाड्यामध्ये प्रस्तुत "युनायटेड सर्दिहस क्लय" असून तेथें नृपांगनांच्या मृदुल लीलांऐवजी आंग्लजनांचे पौरुषविहार चालत असतात. ह्या चारुतर मंदिराच्या जवळच 'गुलिस्तान