पान:अयोध्येचे नबाब.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखनौ. swords of Khorsan, steel-lances, and halberds, the turbans of renowned commanders; the trapping of the white horse of Naseer-ud-deen, mounted on a wooden effigy, and several pulpits of peculiar sanctity." ह्या मूल्यवान सामानापैकी ब्रिटिश सरकाराच्या कृपेनें थोडेबहुत रोषनाई, सामान, एक रुप्याचे सिंहासन, व दुसरे काही जिन्नस तेथे अद्यापि शिल्लक राहिले आहेत. सन १८५७ सालचे बंडाचे वेळी येथील मूल्यवान जिनसांचा फार नाश झाला असे म्हणतात. येथे नबाब असफउद्दौला ह्याची कबर असून तिचे मखर रुप्याचे केले आहे. त्या मखरावर घालण्याची बहुमूल्य भरजरी चादर व इतर रत्नांचे अलंकार अद्यापि राहिले आहेत. पूर्वीच्या अपार संपत्तीच्या मानाने हे कांहींच नव्हत; तथापि ज्यांना प्राचीन वैभवाची काहीच कल्पना नाही त्यांना एवढ्याच जिनसा पाहूनही फार आश्चर्य वाटते. ' ह्या इमारतीच्या संरक्षणाकरिता काही लोक ठेविले आहेत. प्रतिवर्षी येथे मोहरमाचा महोत्सव होत असतो. येथे पूर्वी एक सोन्याचा ताबूत होता, परंतु तो आतां दृष्टीस पडत नाही. लक्ष्मीच्या चंचल स्वभावाप्रमाणे येथील सर्व संपत्ति नष्ट झाली आहे. तरी ह्या सौंदर्यपूर्ण इमारतीने प्रेक्षकांच्या मनांत प्राचीन वैभवाची काहीतरी कल्पना उत्पन्न होउन कालाची कुटिल गति दिसून येते. लखनौतील ही सुंदर इमारत पाहून प्रेक्षकांस ही विश्वकानेच निर्माण केली आहे की काय असा भास होतो. खरोखर, आग्र्याचा ताजमहाल व लखनौचा इमामवाडा ह्यांच्यासारख्या लोकोत्तर इमारती आमच्या देशांतील कारागिरांच्या कुशलतेचे उत्तम प्रदर्शन होत. इमामवाड्याच्या सौंदर्याचे वर्णन जितकें लिहावें तितकें थोडेंच आहे. लॉर्ड व्हॉलेन्शिया ह्यांनी ही सुंदर इमारत पाहून असे उद्गार काढिले की : “The Imambarah, the mosque attached to it, and the gateways that lead to it, are beautiful specimens of this architecture (light, elegant, but fantastic). From the brilliant white of the composition and the minute delicacy of the workmanship, an enthusiast might suppose that genii had been the artificers."