पान:अयोध्येचे नबाब.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. wwwwwvorry झाली असेल ह्याची कल्पना करणेही कठीण आहे. ह्या इमारतीमध्ये एक फार सुंदर व भव्य असा १६३ फूट लांबीचा व ५३ फूट रुंदीचा दिवाणखाना आहे. त्याची नक्षी व एकंदर काम फार सुरेख आहेच. तथापि त्यांतल्या त्यांत, विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट ही की, एवढा मोठा दिवाणखाना निराधार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खांब वगैरे मुळीच नाहीत; एवढेच नव्हे, पण ह्या इमारतीत कोठेच लांकूड नाही. त्यामुळे युरोपखंडांतले सर्व प्रवासी ह्या इमारतीची अत्यंत प्रशंसा करितात. आणि अशी इमारत सर्व युरोपखंडामध्ये नव्हे, पण सर्व जगामध्ये कोठेही नाही असे स्पष्टपणे कबूल करितात. ह्या इमारतीचे प्रचंड स्वरूप पाहून प्रेक्षकांस एकदम फार आश्चर्य वाटते. ह्या भव्य इमारतीमध्ये प्रवेश करून मध्यभागी आले म्हणजे अपूर्व कौतुक वाटते. मोठ्या कल्पकतेनें तयार केलेल्या वातायनांतून प्रकाशलहरी आंत येऊन ह्या प्रचंड इमारतीस अत्यंत प्रकाशित करितात. ह्या सौंदर्यमंदिराच्या भिंतीस पूर्वी रजतसुवर्णाचे पाणी देउन त्यावर सुंदर वेलबुट्टी काढली होती. आता ती बिलकुल राहिली नाही, तरी क्वचित् क्वचित् रौप्यतेज दृष्टीस पडते. ज्या वेळी दिनमणिकिरणांची अत्युज्ज्वल प्रभा परावर्तन पावून ह्या मंदिरामध्ये झळकू लागते त्या वेळी नेत्रांस परम आल्हाद वाटतो. लखनौचे राजवैभव कायम होते त्या वेळी वैभवालंकृत स्थितीमध्ये ज्यांनी ही सुंदर इमारत पाहिली होती त्यांना तिचे विशेष सौंदर्य अवलोकन करून अत्यानंद झाला असेल, ह्यांत शंका नाही. सन १८२४ सार्ली बिशप हिबर ह्या प्रसिद्ध व शोधक बुद्धीच्या प्रवाशाने ह्या इमारतीचे वैभव अवलोकन केले होते. त्याने तिचे वर्णन पुढे लिहिल्याप्रमाणे केले आहे : “Through the open marble arches nothing else was, at first, visible. The whole building was hung with them: immense pyramids of silver, gold, prismatic crystals, and colored glass; and where they were too heavy to be hung, they rose in radiant piles from the floor. In the midst of them were temples of silver filagree, eight or ten high, and studded with cornelians, agates and emeralds......There were ancient banners of the Nawabs of Oudh, heavy with sentences from the Koran, embroidered on gold gigantic hands of silver covered with the name of God;