पान:अयोध्येचे नबाब.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लखनौ. नांस हे एक कौतुकास्पद स्थान वाटत आहे. ह्यांपैकी कित्येकांनी त्याची तुलना मास्को अथवा कान्स्टंटिनोपल ह्याशी केली आहे. येथील प्राचीन इमारती अद्यापि सुस्थितीत असून त्यांपैकी कित्येक अत्यंत प्रेक्षणीय आहेत. त्यांचे संक्षिप्त वर्णन येथे सादर केलें आहे. इमामवाडा. अयोध्येच्या नबाबाच्या अपार संपत्तीचे द्योतक आता फक्त लखनौ येथे दीन स्थितीत असलेले भव्य व प्रचंड राजवाडेच होत, असे म्हटले तरी चालेल. ह्या राजवाड्यांमध्ये आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांस थक्क करून सोडणाऱ्या इमारती तीनचारच आहेत. इमामवाडा, छत्तरमंझील, कैसरबाग, दिलखुष राजवाडा, लालबारद्वारी, वगैरे इमारती केवळ अप्रतिम आहेत. त्याचप्रमाणे इ० स० १८५७ सालच्या बंडाने इतिहासप्रसिद्ध झालेली लखनौ येथील "रोसिडेन्सी" नामक इमारत हीही अवलोकन करण्यासारखी आहे. ह्या सर्वांत इमामवाडा तर सर्व कलाकौशल्याचे आगरच आहे. ही इमारत नबाब असफउद्दौला ह्याच्या कारकीर्दीत बांधली आहे. असफउद्दौला फार धनाढ्य व चैनी होता. एक वेळ त्याच्या मनांत असें आले की, दुसरीकडे कोठे ज्या नमुन्याची इमारत झाली नाही व जिचा नमुना पुढेही कधी कोणास बनवितां येणार नाही अशी अद्वितीय इमारत बांधावी. वजीरसाहेबांच्या मनांत ही गोष्ट आली. मात्र, की "राजा बोले व दळ हाले" ह्या म्हणीप्रमाणे हजारों चतुर कारागीर जमा झाले. त्यांत किफायतउल्ला नामक एक अचाट बुद्धीचा इसम सरकारस्वारीपुढे आला व त्याने सर्व कारागिरांचे नमुने व बेत नापसंत करून स्वतःच्या कल्पनेनें एक अद्भुत व अलौकिक इमारतीचा नमुना तयार करून दाखविला. तो सर्वानुमतें पसंत ठरून त्याप्रमाणे एक सुंदर व भव्य इमारत सन १७८६ साली बांधण्यात आली. तीच इमामवाडा ही होय. त्या सालापूर्वी दोन वर्षे हिंदुस्थानांत दुष्काळ पडला होता, तेव्हां त्या वेळी अन्नान झालेल्या लोकांनी कामावर यावे अशा हेतूने ही प्रचंड इमारत बांधण्याचा बेत असफउद्दौल्याने केला होता असे मानण्यास काही हरकत नाही. कोट्यवधि रुपये खर्च करून झालेली इमारत किती अप्रतिम व मनमोहक