पान:अयोध्येचे नबाब.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. २ लखनौ. - ItOI हे उत्तर हिंदुस्थानांतील नामांकित शहरांपैकी एक शहर आहे. येथे अयोध्येच्या नबाबांची राजधानी होती त्यामुळे तें इतिहासप्रसिद्ध व प्रेक्षणीय झाले आहे. हे औध-रोहिलखंड रेलवेचे मुख्य ठिकाण असून येथे येण्यास काशी-फैजाबाद, कानपूर-लखनौ, किंवा अल्लीगड-बरेली असे रेलवेचे तीन रस्ते आहेत. हे शहर अतिशय विस्तीर्ण असून ह्याचे क्षेत्रफळ सुमारे १३ मैल आहे. येथील लोकवस्ती इ०स० १८९१ च्या खानेसुमारीप्रमाणे २,७३,०२७ असून त्यांत १,६१,८९६ हिंदु व १,०४,१९८ मुसलमान आहेत. येथील मुसलमानलोकांची वस्ती नवाबाच्या राज्यामुळे फार वाढली होती. हे बहुतेक शिय्या पंथाचे आहेत. हिंदु व मुसलमान असा लखनौच्या नबाबांच्या कारकीर्दीत फारसा भेदभाव नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जातिमत्सराचे बंड फारसें नाही. अयोध्येच्या राज्यांत हिंदु व मुसलमान ह्यांची मारामारी फक्त इ० स० १८५५ साली वाजिदअल्लीशहा ह्याच्या कारकीर्दीत काय ती एक वेळ झाली. ह्यावरून उभय जातींमध्ये परस्पर प्रेमभाव पूर्वापार वसत आहे असें म्हणण्यास हरकत नाही. लखनौ शहर गोमती नदीच्या काठी वसले असून तें फार प्राचीन आहे असें मानितात. हे श्रीरामाचा बंधु लक्ष्मण ह्याने वसविलें म्हणून त्यास 'लक्ष्मणपूर' असे नांव पडले, व त्याचा अपभ्रंश लखनौ असा झाला असावा असें प्राकालीन इतिहाससंशोधकांचे मत आहे. पूर्वी येथे लक्ष्मणकिल्ला, ज्यास तद्देशीय लोक 'लक्ष्मणतिल्ला' असे म्हणतात, ह्या नांवाचा एक प्राचीन किल्ला होता, त्यावर अयोध्येच्या राज्याचा संस्थापक सादतखान ह्याने 'मच्छीभवन' नामक किल्ला बांधिला व हे शहर वसविण्यास प्रारंभ केला, अशी इतिहासावरून माहिती समजते. पुढे अयोध्येच्या नबाबांचा जसजसा उत्कर्ष झाला तसतसे हे शहर भरभराटीस येऊन, राज्यवैभव आणि कलाकौशल्य ह्यांचे आगरच होऊन राहिले. येथे नबाब असफउद्दौला ह्याने इ. स. १७७५ ह्या वर्षी आपली राजधानी केली. येथील भव्य व प्रचंड राजवाडे, रमणीय उद्याने आणि नानाविध सुंदर स्थळे, ह्यांच्या योगाने प्रवासीज--