पान:अयोध्येचे नबाब.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्या. दृष्टीस पडतो, तो वर्णन करणे कठीण आहे ! नदीच्या एका तीरावर सर्व देवालये एका ओळीने बांधलेली असल्यामुळे त्यांची उच्च उच्च शिखरें जणों गगनमंडलास भेदीत आहेत; एकीकडे हिरवीगार शेते आपल्या हरितप्रभेने पृथ्वीस शालू नेसविल्याचे भासवीत आहेत; शरयूच्या पश्चिमतीरावरील देवालयांतून गंभीर घंटारव ऐकू येत आहेत; निरनिराळ्या कुंडावर व घांटावर तद्देशीय ब्राह्मण व गोसावी संध्यावंदनांत निमग्न झालेले दिसत आहेत; कोठे जटाजूट धारण केलेले साधुजन श्रीरामभक्त तुळसीदास ह्यांची प्रासादिक पद्यं म्हणत आहेत; असा तो रमणीय देखावा कोणाचे हृदय संतुष्ट करणार नाही ! रामचंद्राच्या लीलेसंबंधाने एतद्देशीय लोक हजारों स्थळे दाखवितात व प्रत्येक ठिकाणी 'महाराज, दर्शन करो' म्हणून विनंति करितात; परंतु तेथें पूर्वीच्या रामलीला झाल्या असतील की नाही ह्याबद्दल सुज्ञ यात्रिकांस निराळा विचार करण्याचे कारणच नाही. खरी अयोध्या जी आहे तिचे उत्तररामचरित्रांत म्हटल्याप्रमाणे: पुरा यत्र स्रोतःपुलिनमधुना तत्र सरिताम् विपर्यासं यातो घनविरलभावः क्षितिरुहाम् । बहोर्दृष्टं कालादपरामिव मन्ये वनमिदम् निवेशः शैलानां तदिदमिति बुद्धि दृढयति ॥ इतकें रूपांतर होउन गेले आहे. तेव्हां तीत घडलेल्या सर्व रामलीला दाखविण्यास कोण समर्थ आहे ? तथापि महाकवि वाल्मीकि ह्यांनी आपल्या सुरस वाणीने में रामचरित्र वर्णिले आहे ते प्रत्येक हिंदु हृदयांत पूर्णपणे प्रतिविवित झाल्यामुळे कल्पनादृष्टीस ते येथे घडले असेल असें भासून चित्तास आनंद वाटतो. ह्यावरून कवि वाल्मीकि ह्यांच्या कृतीची थोरवी अगाध आहे असें वाटून त्यांच्या चरणी प्रत्येकास लीन व्हावे अशी इच्छा होते. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् । भारूढकविताशाखं वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।। १॥