पान:अयोध्येचे नबाब.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. नेत्रांची तृप्ति होत नाही. देवाचे अलंकार व पोषाख बहुमूल्य असून पुण्यादिनी त्यांचा उपयोग करीत असतात. हे स्थान इतकें शांत व रम्य आहे की, तेथे भक्तिमान् दर्शनोत्सुकांची हृदयें आनंदाने भरून जातात. ह्या देवालयाच्या पुढील भागांत श्रीरामचंद्रजी, लक्ष्मण व सीता ह्यांच्या मूर्ति आहेत. त्या मूर्ति अगदी लहान असून त्यांचे मंदीरही अगदी लहान आहे. ह्या श्रीरामचंद्रजीच्या नगरीमध्ये रामसेवकाचेंच महात्म्य विशेष आहे. ह्यावरून परमेश्वरास भक्ताची प्रीति जास्त आहे असे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ज्या भक्ताचा परमेश्वराच्या ठायीं निस्सीम भाव असतो त्यास परमेश्वर 'मस्तकींचा मुकुट करीन मी' असे म्हणत असतात. त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय! असो. ह्या उच्च स्थलावरून दूरवरचा फार मनोहर देखावा दृष्टीस पडत असतो. त्याचें वर्णन करावे तितकें थोडेच आहे. ___ हनुमानगढीशिवाय येथे सप्तहरीची स्थाने फार प्रसिद्ध आहेत. नागेश्वर महादेव ह्या नांवाचे एक शिवस्थान आहे, तेथे महाराष्ट्र ब्राह्मण दृष्टीस पडतात; पण ते याचनावृत्तीमध्ये गढून गेले आहेत. अयोध्येमध्ये राममंदिरें तर पुष्कळच आहेत. त्या सर्वांचे उत्सव रामनवमीमध्ये सुरू होतात. त्या वेळी अयोध्येस हजारों यात्रा जमत असते. बैरागी लोकांचे मेळे येथे फारच आहेत. त्यांचे माहात्म्य पूर्वी विशेष असून त्यांचे निरनिराळे पंथ व त्या प्रत्येक पंथाचे वेगवेगळे आखाडे असत. त्यांत निर्वाणी, निर्मोही, दिगंबरी, खाकी, महानिर्वाणी, संतोखी, निरालंभी हे पंथ फार प्रसिद्ध असून त्या प्रत्येक पंथाचे निर. निराळे आचार्य असत व त्यांचा फार मान असे. पुढे पुढे त्यांचे प्रस्थ बरेच कमी झाले. तथापि इंग्रज अंमल होण्यापूर्वी सुग्रीवकिल्ला, रामप्रसादका काना व विद्याकुंड येथे अनुक्रमें १००, १५०, २०० बैरागी मोठे मानकरी असत. इ० स० १८५५ साली येथे बैरागी व मुसलमान लोकांमध्ये मोठ्या मारामाऱ्या झाल्या. त्यामुळेच येथे इंग्रज सरकारचा बंदोबस्त कडेकोट झाला आहे. बहुविध राममंदिरांशिवाय येथें तीर्थे व रामकुंडे अनेक आहेत. ह्या सर्व ठिकाणी यात्रेकरूंना क्षेत्रविधि करावे लागतात. अयोध्येतील सृष्टिसौंदर्याचा सर्वांत उत्तम देखावा शरयूतीरी दृष्टीस पडतो. प्रातःकाली व सायंकाली येथें जो उदात्त, सुशांत व आल्हाददायक देखावा