पान:अयोध्येचे नबाब.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्या. मुसलमानांच्या कारकीर्दीत झाले असून, आतां ह्या नगरीमध्ये प्राचीन सौंदर्यदर्शक एकही चिन्ह राहिले नाही, असे स्पष्ट म्हणणे भाग पडते. प्रासादलविकृतैः पर्वतैरिव शोभिताम् ॥ कूटागारैश्च संपूर्णामिंद्रस्येवामरावतीम् ॥ १॥ अशी नगरी आतां दारिद्याचे वसतिस्थान बनावें ही कालाची केवढी अजब लीला आहे बरें ? वाल्मीकिरामायणांतील अयोध्येचे वर्णन ऐकल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकास अयोध्यादर्शनाची उत्कंठा अतितर असते. परंतु ती सांप्रतच्या अयोध्यानगरीत प्रवेश केल्याबरोबर लागलीच कमी होते. प्रस्तुत ह्या पुण्यकर क्षेत्रामध्ये नेत्रानंददायक स्थले फारशी नाहीत; तथापि भक्तिभावाने जाणाऱ्या यात्रेकरूस हृदयाल्हादकारक अशी देवालये बरीच आहेत. त्यांत 'हनुमानगढी' ही प्रमुख होय. येथें पूर्वी 'रामगढी' व 'हनुमानगढी' अशा दोन गट्या असून त्यांत श्रीराम व त्यांचा भक्त हनुमान् ह्यांची देवालये होती. त्यांपैकी यवनांच्या कारकीर्दीत रामगढीचा नाश झाला. आतां फक्त हनुमानगढी हेंच देवस्थान पाहण्यासारखें राहिले आहे. ही गढी केवळ किल्ल्याप्रमाणे भव्य असून आपल्या प्राचीनत्वाची साक्ष ठिकठिकाणी देत असते. ह्या गढीचे प्रचंड बुरूज व तोफेसही हार न जाणान्या खंबीर भिंती दूरवर दिसत असतात. ह्या गढीचा दरवाजा अत्यंत मोठा असून त्यांतून वर जाण्यास दगडी पायऱ्या आहेत. त्या चढ़न वर गेलें म्हणजे रामदूत श्रीहनुमान् ह्याचें एक देवालय दृष्टीस पडते. हे देवालय लहानच आहे, तरी त्याचे बांधकम सर्वोत्कृष्ट असून ते प्रेक्षकांचे रंजन केल्यावांचून रहात नाही. ह्या मंदिराचा कळस सुवर्णमय असल्यामुळे त्याची प्रभा दिनकराच्या दिव्यतेजानें आसमंतात् प्रदेशी चमकत असते. येथे एक भगवी ध्वजा लाविली आहे. ती वायूच्या लहरीवरोबर एकसारखी फडकत असते. त्यावरून जणूं पवन स्वपुत्राची (अंजनीसुताची) अद्वितीय रामभक्ति प्रेमाने गात आहे, असा भास होतो ! या देवालयामध्ये हनुमंताची प्रचंड मूर्ति असून तिचा पूजाअर्चादि समारंभ फार प्रेक्षणीय असतो. हनुमंताचें मुख व नेत्र इतके तेजस्वी आहेत की, त्या योगाने प्रेक्षकाचे हृदय हर्षभरित होऊन त्या स्वरूपाचे कितीही दर्शन घेतले तरी