पान:अयोध्येचे नबाब.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. प्रथमतः वसविली, असे लिहिले आहे; पण त्याबद्दलची विश्वसनीय माहिती मिळणे कठीण आहे. नवीन अयोध्या विक्रमादित्य राजानें इ० स० पूर्वी ५७ व्या वर्षी बांधली असा जो लेख सांपडतो तो मात्र बराच भरंवसा ठेवण्यासारखा दिसतो. यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळां उध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक दोन मैल लांब होती, असे म्हणतात . फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे सामान जे जमिनीमध्ये दृष्टीस पडतें तें पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असें प्राकालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधिली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असें इतिहासावरून दिसून येते. अयोध्येमध्ये प्रस्तुत प्राचीन देवालये फार थोडी आहेत. हनुमानगड व रामगड अशी जी दोन स्थळे येथे दृष्टीस पडतात ती मात्र बगैच प्राचीन असावीत, अशी कल्पना आहे. ह्या दोन स्थळांपैकी हनुमानगड, ज्यास तेथील लोक 'हनुमानगढी' म्हणतात तें मात्र सध्या अस्तित्वात आहे. दुसरे रामगड हे नाममात्र राहिले आहे. त्या स्थळी पूर्वी रामजन्मस्थान होते. परंतु ते नष्ट करून त्यावर औरंगजेब बादशहाने मशीद बांधली आहे. येथून जवळच मणिपर्वत, कुवेरपर्वत आणि सुग्रीवपर्वत अशी जुनी स्थाने आहेत, परंतु त्यांमध्ये दर्शनीय अशी एकही गोष्ट राहिली नाही. सांप्रतची अयोध्या ही एक जुनाट, वैभवहीन व सौंदर्यरहित अशी लहानशी नगरी आहे. रामायणामध्ये, कोशलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् ॥ निविष्टः शरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥१॥ अयोध्या नाम नगरी तत्रासीलोकविश्रुता ।। मनुना मानवेन्द्रेण या पूरी निर्मिता स्वयम् ॥ २ ॥ म्हणून ज्या नगरीचे वर्णन केले आहे त्या नगरीचा आता मागमूसही राहिला नाही. प्रस्तुत येथे लहान लहान पण जीर्ण अशा 'गृहपंक्ति दिसत असून दारिद्यावस्थेनें गांजलेले नागरिक जन मात्र दृष्टीस पडतात. त्यावरून हे सर्व स्थित्यंतर