पान:अयोध्येचे नबाब.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ला.] अयोध्या-देशस्वरूप व प्राचीन माहिती. मैलांवर साहेतमाहेत म्हणून जे नाश पावलेलें एक प्राचीन नगर आहे तेथें राज्य करीत होता. येथे सुमारे पांच शतकें बौद्धशाखेच्या राजांचा अंमल होता. गौतम बुद्धाचे कारकीर्दीत साहेतमाहेत ही प्रसन्नजित नामक राजाची राजधानी असून त्या राजाने नूतन धर्माचा म्हणजे बुद्धधर्माचा स्वीकार केला होता. त्याचा मुलगा विरुदत्त झाने शाक्यांचा छल करून त्यांच्या प्रांतावर अनेक स्वाऱ्या केल्या. साहेतमाहेत हे मगध देशाच्या गुप्त राज्याचें एक मांडलिक संस्थान असून त्या राज्याचा लय झाल्यानंतर त्याचाही इ० स० ३१९ मध्ये कय झाला असावा असे दिसते. ह्या कालानंतर पुढील कित्येक शतकांचा अयोध्येचा इतिहास उपलब्ध नाही. तथापि इ० स० १०५० पर्यंत हा प्रांत पाटणा आणि कनोज येथील राजांच्या ताब्यांत होता असें स्थूलमानाने म्हटले तरी चालेल. ह्या समयास भार नामक लोक-ज्यांचे वंशज अद्यापि फैजाबाद व सुलतानपूर ह्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांनी बंड करून कनोजची राज्यसत्ता झुगारण्याचा यत्न केला. त्यांत त्यांस चांगले यश आले व त्यांच्यापैकी बाल व दाल ह्या दोन पुरुषांच्या संयुक्त कारकीर्दीत त्यांच्या राज्यसत्तेचा चांगला अभ्युदय होऊन तिचा प्रसार माळवा प्रांतापर्यंत झाला. ह्यांच्या ताब्यामध्ये करा व कलिंजर हे दोन किल्ले होते. कालचक्राच्या विचित्र गतीने ह्या सत्तेचा लवकरच नाश झाला. दिल्लीचा बादशहा नासिरुद्दीन महमद ह्याने इ० स० १२४६ मध्ये ह्या भारराज्यसत्तेचा समूळ नाश करून तो प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतला. ह्या राज्यक्रांतीची हकीकत फेरिस्ताने आपल्या इतिहासांत दिली आहे. नासिरुद्दीन महमद ह्याचे ह्या प्रांतावर सार्वभौमत्व संस्थापित झाल्यावर अयोध्येमध्ये लहान कहान संस्थाने बरीच निर्माण झाली. ती मुसलमान सत्तेशी