पान:अयोध्येचे नबाब.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थलवर्णन. १. अयोध्या. अयोध्या ही प्राचीन पुराणप्रसिद्ध नगरी सांप्रत वायव्य प्रांतांतील फैजाबाद जिल्ह्यांत फैजाबाद शहरानजीक पांच सहा मैलांवर आहे. काशीहून लखनौकडे जाणारा औध-रोहिलखंड रेलवे म्हणून जो रेलवेचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर लखनौच्या अलीकडे ८९ मैलांवर फैजाबाद में स्टेशन आहे. येथून अयोध्यागावांत जाण्यास उत्तम रस्ता असून वाहने वगैरे चांगली मिळतात. फैजाबाद हे अयोध्येच्या नबाबाच्या कारकीर्दीत इ० स० १७२४-इ० स० १७७५ पर्यंत राजधानीचे शहर असल्यामुळे तेथील गतवैभवदर्शक कित्येक स्थळे पाहण्यासारखी आहेत. ह्या शहरास 'बंगला' असेंही नांव आहे. अयोध्या येथे शरय नदी असून तिच्यामध्ये 'स्वर्गद्वार' म्हणून एक मोठे तीर्थ आहे. तेथून श्रीरामचंद्र आपलें अवतारचरित्र समाप्त करून स्वर्गास गेले. म्हणून त्यास 'स्वर्गद्वार' असें नांव पडले आहे. त्याचे माहात्म्य अयोध्यापुराणांत वर्णन केले आहे. रामचंद्राचे जन्मस्थान येथेच असल्यामुळे हे स्थळ फार पुण्यदायक मानिले जाते, एवढेच नव्हे तर अयोध्यानगरी ही पुराणांतरीं वर्णन केलेल्या " अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ॥ पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षायकाः" ॥१॥ ह्या सात मोक्ष देणाऱ्या नगरींमध्ये आद्यस्थानी गणलेली आहे. ह्या प्रांताचे प्राचीन नांव उत्तर कोसल असें आहे. रामचंद्राच्या वेळची अयोध्या आतां मुळीच राहिली नाही. रामायणांत ज्या अयोध्येचे वर्णन दिले आहे ती इसवी सनापूर्वी ५०० वर्षांची अयोध्या अद्यापि असेल ही कल्पनाही संभवत नाही. तथापि अयोध्येइतकें प्राचीन शहर दुसरे कोणतेच नाही. ही गोष्ट अगदी सिद्ध आहे. पूर्वीची अयोध्या दोन तीन वेळां उध्वस्त झाली होती, अशीही माहिती मिळते.. वैवस्वतानें इ० स० पूर्वी १३६६ त्या वर्षी ही नगरी