पान:अयोध्येचे नबाब.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૨૮ अयोध्येचे नबाब. [भाग १२ वा.] णामाचा विचार करणे अत्यंत जरूर आहे. नबाब वाजिदअल्लीशहा ह्यास पदच्युत केल्यानंतर अयोध्येची राज्यसूत्रं जनरल औट्राम ह्यांनी आपल्या हातात घेतली, हे मागे सांगितलेच आहे. त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी अयोध्येच्या नबाबाचें में सैन्य होतें तें कमी केलें; पूर्वीचा दिवाण अल्लीनकीखान, राजा बालकिशन व बाबू पूरणचंद्र वगैरे जुन्या लोकांस हुद्यावरून दूर केलें; अयोध्येच्या तालुकदारांवर वसुलाची एकदम सक्ती केली; आणि स्वराज्याचा उपभोग घेतलेल्या राजवंशीय व स्वाभिमानी जुन्या लोकांस फार वाईट रीतीने वागविले; त्यामुळे सर्व लोकांची मनें क्षुब्ध झाली व त्या योगाने इंग्रजांविषयी त्यांच्या हृदयांत द्वेषाग्नि उत्पन्न झाला. त्याचे भयंकर व विक्राळ स्वरूप पुढे कसे व्यक्त झाले व त्याच्या शमनार्थ किती जीव बळी पडले, हे इ० स० १८५७/५८ च्या बंडाच्या इतिहासावरून कळून येण्यासारखे आहे. सर जॉन के, म्यालिसन, वगैरे इतिहासकारांनी त्याचे साग्र वर्णन केले आहे. ते वाचले असतां, एतद्देशीय संस्थाने खालसा करून प्रजेची मर्ने क्षुब्ध करणे राजकास किती अनास्पद होते, हे चांगले व्यक्त होते. त्याचा बोध आमच्या कृपाळू राज्यकर्त्यांनी घेतला आहे, व त्याप्रमाणे प्रजेस सुखी व संतुष्ट करण्याकरितां इ० स० १८५८ साली "राणीचा जाहीरनामा" प्रसिद्ध केला आहे. त्यांत दिलेली वचनें उत्तम प्रकारे पाळून हिंदुस्थानच्या प्रजेस संतुष्ट करावे, व तिचे प्रेम संपादन करावे हे त्यांचे कर्तव्य आहे. आणि प्रजाजनांनीही कालचक्राच्या फेऱ्याने जी स्थिति प्राप्त झाली आहे तींत आनंद मानून आपल्या राज्यकर्त्याविषयी पूर्ण राजनिष्ठा बाळगणे व त्यांचे अभीष्टचिंतन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ही उभयकर्तव्ये राजा व प्रजा ह्यांच्याकडून झाली म्हणजे त्यांत उभयतांचे कल्याण आहे. समाप्त.