पान:अयोध्येचे नबाब.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ वा.] उपसंहार. १२७ ___"रघुनाथराव लखनौस गेले त्या वेळी तेथें अत्यंत अनीति चालू होती. त्या शहरी गरीब रयतेवर तेथील नबाबाच्या अंमलदार लोकांचा मोठा जुलम असे. रघुनाथराव ह्यांनी सूर्योदयापूर्वी मुक्कामाचे जागी जाण्याकरितां या शहरांत प्रवेश केला. तेव्हां एक भाजीवाला वांग्यांनी भरलेली गाडी घेऊन ती विकण्याकरितां बाजारांत जात होता. त्या वेळी असे झाले की, दरवाजाचे चौकीदार कोतवालाचे शिपाई, शहरचे रखवालदार, दिवाणाचे शिपाई, काजीचे शिपाई वगैरेनी ठिकठिकाणी ती वांगी लुचाडून घेतली. त्यामुळे भानीवाला ती गाडी घेऊन बाजारांत पोहोंचेतोपर्यंत त्या गाडीत टोपलीभर देखील वांगी विकण्यास राहिली नाहीत ! असे कितीएक अन्यायाचे प्रकार रघुनाथराव ह्यांनी तेथे पाहिले ! शहरचे वस्तीतून तेथील अमीर लोकांचे मुलांनी भरधांव घोडे पिटीत फिरावें ! त्यांत कधी वृद्ध लोक व लहान मुले सांपडून मरत ! अशा प्रकारचे खून झाल्यावांचून एकही दिवस जात नसे! तेव्हां तें शहर अनीतीचे व लुच्चे लोकांचे केवळ घरच होते असे दिसते. हे सर्व प्रकार पाहून पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी तें राज्य खालसा केलें ! लखनौ येथील नबाबाचे राज्य त्याजकडेसच कायम ठेवून, त्याचे राज्यांत जी अनीति व अंदाधुंदी चालू होती, तिचा मात्र बंदोबस्त करून इंग्रज सरकाराने व्यवस्था केली असती, तर त्याची विशेष कीर्ति होऊन त्याचे हित झाले असते; आणि सन १८५७ साली जे मोठे बंड झाले, त्यास लखनौचें राज्य खालसा करणे हे एक अंशतः कारण झाले असें जे मानितात, त्यांस तसे मानण्यास जागा राहिली नसती." ह्या लेखावरून आमच्या म्हणण्यास अधिक बळकटी येते. अयोध्येचे राज्य न्यायाने किंवा अन्यायाने खालसा झाले त्याबद्दल अधिक चर्चा करण्यांत आतां अर्थ नाही. तथापि झालेल्या गोष्टीच्या परि