पान:अयोध्येचे नबाब.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. -100 उपसंहार. अयोध्येचे राज्य खालसा केल्यानंतर तेथें ब्रिटिश अंमल सुरू झाला. परंतु ही गोष्ट स्वराज्यसुख उपभोगलेल्या प्रजेस पसंत वाटली नाही. वाजिदअलीशहाची कारकीर्द इतकी जुलमाची व अंदाधुंदीची झाली, तथापि तिच्या मुळे लखनौच्या भरभराटीस किंवा व्यापारास कमीपणा आला नाही. त्याचप्रमाणे अयोध्येत कितीही जुलम झाले किंवा अन्याय झाले तरी देशांतील द्रव्य देशाबाहेर गेले नाही; त्यामुळे तेथील सांपत्तिक स्थितीत फारसा फरक पडला नाही. ह्या कारणांस्तव नवीन राज्यक्रांति तेथील लोकांस पथ्यकर न वाटणे साहजिकच आहे. राज्यसुधारणेच्या दृष्टीने राज्यव्यवस्थेत फेरबद्दल होणे जरूर होते, परंतु सर्वस्वी राज्यक्रांति होणे किती अवश्य व न्याय्य होते हा मोठाच प्रश्न आहे. त्याचा विचार करण्याचे प्रकृत स्थल नाहीं, तथापि स्थूलमानानें लखनौच्या नबाबापासून तो कमी दर्जाच्या नौकरापर्यंत हा राजकीय फेरफार कोणांस प्रिय झाला नाही, असे त्यांच्या भावी वर्तनावरून व इंग्लंडांतील चळवळीवरून व्यक्त होते. नबाब वाजिदअल्ली ह्यास इंग्रजसरकाराने लखनौच्या गादीवरून अन्यायाने पदच्युत केले व अयोध्येचें राज्य विनाकारण खालसा केले, असे दाखविण्याबद्दल इंग्लंडमध्ये पुष्कळ चळवळ झाली; व नबाबाच्या वतीने तेथें मेजर बर्ड, मेंझेस, मालकम् ल्युविन, वगैरे कित्येक युरोपियन लोकांनी पुष्कळ खटपट केली. त्याचप्रमाणे नबाबाने व त्याच्या पदरच्या मसीउद्दीन नामक एका हुशार मनुष्याने, अयोध्येच्या