पान:अयोध्येचे नबाब.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ अयोध्येचे नबाब. [भाग ११ वा] त्याजवर मृत्यूची मेहेरबानी होऊन तो आपल्या करुणास्पद, वैभवहीन व पारतंत्र्ययुक्त स्थितीतून ता० २१ सप्टेंबर इ० स० १८८७ रोजी मुक्त झाला. त्याचे वंशज अद्यापि हयात असून 'अयोध्येचे नबाब' ह्या नांवाने उत्तर हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी कित्येकांवर ब्रिटिशसरकारची कृपा असून ते त्यांच्या सन्मानास व बड्या बड्या किताबासही पात्र झाले आहेत. येणेप्रमाणे नबाब वाजिदअल्लीशहा ह्याच्या दुर्दैवी चरित्राची कथा . आहे. ह्यावरून पुष्कळ गोष्टींचा बोध घेण्यासारखा आहे. त्यांत मुख्यत्वेकरून दुराचाराचा परिणाम कधीही चांगला होत नाही हे उत्तम प्रकारे शिकण्यासारखे आहे. ते प्रत्येकाने अवश्य लक्ष्यात ठेवून सुसंगति व सद्विचार ह्यांचा सदैव स्वीकार करावा व आपले वर्तन सत्य, सरल, आणि शुद्ध असे ठेवावे; म्हणजे त्यास सत्कीर्ति प्राप्त होऊन त्याचा शेवट अत्यंत सुखदायक व आनंदप्रद झाल्यावांचून कधीही राहणार नाही.