पान:अयोध्येचे नबाब.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वा.] वाजिदअलीशहा. १२३ शहा ह्यास कैद करून ता० १३ मार्च इ० स० १८५६ रोजी कलकत्त्यास पाठविले. त्याची लखनौहून रवानगी झाली त्या वेळी सर्व नागरिकांस अत्यंत दुःख झाले. त्यांनी त्याचे शेवटचे दर्शन घेण्याची त्वरा करून त्यास “ बादशहा सलामत," "बादशाहत फिर बन रहे," "लंडनसे हुकूम आजावे" वगैरे प्रेमपूर्वक आशीर्वाद दिले. त्या वेळचा हृदयद्रावक देखावा पाहून प्रत्येक स्वराज्यप्रिय प्रजाजनांच्या नेत्रांतून दुःखाश्रु आल्यावांचून राहणार नाहीत! _ नबाब वाजिदअल्ली ह्यास पदच्युत केल्यानंतर त्याचा भाऊ मिा शिकंदर हशमत बहादूर व त्याची आई जनाब औलिया बेगम ह्या उभयतांनी इंग्लंडच्या महाराणीसाहेबापांशी दाद मागण्याकरितां अत्यंत परिश्रम केले ; व स्वतः इंग्लंडमध्ये जाण्याची तसदी घेतली. परंतु त्यांच्या प्रयत्नास यश न येऊन ते प्यारिस येथे परत आले व तेथेच मृत्यु पावले. नबाब वाजिदअल्लीशहा हा कवि मोरोपंत ह्यांनी म्हटल्याप्रमाणे: " हांसत कर्म करावें, भोगावें रडत तेंच परिणामी " ह्या व्यवहारनियमाप्रमाणे आपल्या नीच कर्माची फळे भोगण्याकरितां कलकत्ता येथे गेला. तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी लखनौ येथे बंड झाले व त्याजवर राजद्रोहाचा आरोप आला. पुढे त्यास राजकीय कैद प्राप्त होऊन तो फोर्ट उइल्यम नामक कलकत्ता येथील प्रसिद्ध किल्यामध्ये बंदिवासांत पडला. परंतु हिंदुस्थानचे शांत व दयाळू गव्हरनर जनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांनी त्यास ता० ९ जुलई इ० स० १८५९ रोजी प्रतिबंधांतून मुक्त करून 'गार्डन रीच' नामक एका उत्तम राजवाड्यांत ठेविले. तेथे त्यास १२ लक्ष रुपये पेनशन मिळत असे. त्याचा स्वीकार करून आपल्या आयुध्याचे दिवस कंठीत तो तेथे बरीच वर्षे राहिला होता. शेवर्टी