पान:अयोध्येचे नबाब.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग Lunarianwwwww rwarrammarnawwwwwwwwwwwwwwwwarnawww५,४५.१०.४५ चालले तरी त्या कालापासून विक्रमादित्य राजा अवतीर्ण होईपर्यंत ह्या प्रांताच्या इतिहासाचा अगदीच मागमूस नाही. विक्रमादित्याचा ह्या प्रांतावर अंमल होता असें मानण्यासही सबळ पुरावा नाही. ह्यवेन त्संग नामक प्रसिद्ध चिनी प्रवासी इ० स० ६२९ ते इ० स० ६४२ ह्यांच्या दरम्यान हिंदुस्थानांत आला होता. त्याने आपल्या प्रवासवर्णनांत कोणी विक्रमादित्य नामक बौद्धधर्मनिषेधक व ब्राह्मणमतानुयायी राजा स्रावस्ती ऊर्फ अयोध्यानगरीमध्ये राज्य करीत होता असे लिहिले आहे. त्याच्याच आधारावरून पुराणवस्तुसंशोधक खात्याचे (Archeological Department) अधिकारी जनरल कनिंगह्याम ह्यांनी ह्या नगरीच्या पुनःसंस्थापनेचं यश त्यास दिले आहे.. हिंदु लोकांमध्येही अशी एक दंतकथा प्रचलित आहे की, ह्या राजाने पूर्वीच्या अयोध्या नगरीचा शोध केला आणि श्रीरामाच्या वेळची प्राचीन स्थळे शोधून काढिली. ह्यानेच श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न ह्यांच्या विमल कीर्तीच्या संस्मरणार्थ ३६० देवालये बांधिली. परंतु ह्या देवालयांपैकी एक तरी देवालय सांप्रत विद्यमान आहे असें खात्रीने सांगणे कठीण आहे. नागेश्वर महादेव म्हणून में एक देवालय आहे ते मात्र प्राचीन असून, बाकीची सर्व देवालये एक दोन शतकांतच बांधलेली आहेत. प्राचीन देवालये कालवैचित्र्याने व यवनांच्या द्वेषाने नष्ट झाली असून, फक्त त्यांची जुनी स्थाने ह्या देवालयांनी सुशोभित केली आहेत असेंही कित्येकांचे मत आहे. रामनामाचा व अयोध्येचा जितका संबंध आहे तितकाच बुद्धाचाहि आहे. सुप्रसिद्ध बुद्ध हा शाक्य घराण्यांतील एक नृपति असून त्याचा सूर्यवंशाशी संबंध होता अशीही दंतकथा आहे. ह्या राजाचा अयोध्येवर काही दिवस अंमल असून तो अयोध्येच्या उत्तरेस ५०