पान:अयोध्येचे नबाब.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० अयोध्येचे नबाब. [ भाग करितां पूर्वीचा तह रद्द करून रेसिडेंटाच्या म्हणण्याप्रमाणे नवीन तह मान्य करावा, अशी नबाबाची समजूत घातली होती. हे पत्र दिल्यानंतर रेसिडेंट ह्याने आपला नवीन तहाचा खलिता त्यास सादर करावा व तो पसंत करण्यास तीन दिवसांची मुदत द्यावी. त्याप्रमाणे त्याने मान्य केले तर ठीकच आहे ; नाहीतर अयोध्येचे राज्य गव्हरनर जनरलचे जाहिरनामे प्रसिद्ध करून ताब्यात घ्यावें, असे कळविले होते. ह्याप्रमाणे रेसिडेंट जनरल औट्राम ह्यांस सूचनापत्रक पोहोचल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे सर्व बंदाबस्त करून तें अमलांत आणण्याची तजवीज केली. त्यांनी प्रथमतः दिवाण अल्लीनकीखान ह्याची तीन दिवस अगोदर भेट घेऊन त्याच्या मार्फत राजवाड्यांत नबाबास भेटण्याची वेळ नेमिली, त्याप्रमाणे ते ता० ४ फेब्रुवारी इ० स० १८५६ रोजी क्याप्टन हेज व वेस्टन ह्यांच्यासहवर्तमान राजवाड्यांत गेले. तेथील सर्व लोकांची शस्त्रे वगरे अगोदरच काढून घेतली होती, त्यामुळे एकही मनुष्य तेथे सशस्त्र राहिला नव्हता. नबाब वाजिदअल्ली हा रेसिडेंटांस सामोरा आला व त्याने त्यांचा सत्कार करून त्यांस नेहमींच्या दरबारांत योग्य स्थानी बसविलें. ह्या भेटीच्या वेळी दिवाण अल्लीनकीखान हा हजर असून नबाबाचा भाऊ शिकंदर हशमतअल्ली, रेसिडेन्सी वकील मशीरउद्दौला व त्याचा नायब साहेबउद्दाला आणि संस्थानचे फडणीस राजा बालकिशन इतकी मंडळी हजर होती. नंतर जनरल औटाम ह्यांनी नबाबाची भेट घेण्याचे प्रयोजन कळवून त्यास गव्हरनर, जनरल ह्यांचा अस्सल खलिता सादर केला. नबाबानें तो लक्ष्यपूर्वक वाचला, आणि काही वेळाने 'मजवर असा प्रसंग कां आला ?? 'मी काय अन्याय केला आहे ?' असे उद्गार काढिले. रेसिडेंटांनी त्यास योग्य उत्तर देऊन त्याच्या