पान:अयोध्येचे नबाब.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वा.] वाजिदअल्लीशहा. अव्यवस्थित कारकीर्दीचे हे फळ आहे असें नीट समजून सांगितले व त्यास नवीन तहाचा मसुदा सादर केला. हा मसुदा पाहिल्याबरोबर नबाबास अत्यंत गहिवर आला व त्याने साहेबउद्दौला ह्यास तो मोठ्याने वाचण्याबद्दल विनंति केली. साहेबउद्दौला ह्यास ती कलमें पाहून अत्यंत विस्मय वाटला व त्याचा कंठ भरून येऊन त्याच्याने तो वाचवेना. तेव्हां खुद्द नबाबानेच तो आपल्या हाती घेऊन प्रत्येक कलम वाचून पाहिले. ह्या मसुद्यामध्ये पुढील कलमें होती. १. अयोध्येच्या राज्यावरील सर्व हक्क नबाबाने कायमचे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन करावेत व कंपनीने नबाबाचा इतमाम राखून त्यास योग्य तैनात द्यावी. २. नबाबाचा 'अयोध्येचा बादशहा' ( King of Oudh ) हा किताब नबाबाकडे व त्याच्या औरस संततीकडे सदैव चालवावा., ३. नबाब व त्यांचे वंशज ह्यांचा ब्रिटिश सरकाराने सर्व प्रसंगी सार्वभौम नृपति ह्या नात्याप्रमाणे इतमाम व मानमरातब राखावा. ४. लखनौच्या राजवाड्यांतले व दिलखुष आणि बिबियापुर ह्या दोन ठिकाणांचे सर्व स्वामित्व नबाबाकडे ठेवून त्यास तेथील देहांतशिक्षेवांचून इतर सर्व हक्क द्यावे. ५. नबाब वाजिदअल्लीशहा ह्यास त्याच्या खर्चाकरितां व शानशौकतीकरितां कंपनी सरकाराकडून अयोध्येच्या वसुलापैकी दरसाल १२ लक्ष रुपये मिळत जातील व त्याच्या राजवाड्यांतील हुजर सैन्याच्या खर्चाकरितां आणखी तीन लक्ष रुपये देण्यांत येतील. त्याचप्रमाणे नबाबाच्या पश्चात् त्याच्या प्रत्येक वारसास कंपनी सरकाराकडून १२ लक्ष रुपये सालिना मिळत जातील. .. ६. नबाबाच्या राजघराण्यांतील सर्व नातेवाइकांस नबाबाच्या इच्छेप्रमाणे कंपनी सरकाराकडून पेनशन मिळत जाईल.