पान:अयोध्येचे नबाब.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [ भाग An Thành Thành - त्याजकडून अयोध्येच्या राज्यावरील सर्व दिवाणी व लष्करी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे कायमचे द्यावेत. "३. नबाबास आपले राज्य काही दिवसपर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून देण्याबद्दल विनति करावी. "४, नबाबाने आपली राज्यव्यवस्था रेसिडेंटाच्या हाती द्यावी व नबाबाच्या लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मदतीने ती चालवावी." ह्या चार मार्गापैकी त्यास पहिला सर्वात उत्तम वाटला. परंतु अयोध्येच्या नबाबांनी ब्रिटिश सरकाराशी इमाने इतबारे वर्तन केले असून संकटप्रसंगी त्यांस चांगले साहाय्य केले होते, तेव्हां एकदम त्यांचे राज्य सर्वस्वी खालसा करणे त्यांना पसंत वाटले नाही. तेव्हां त्यांनी तो मार्ग रहित केला. चवथा मार्ग लॉर्ड वेलस्ली ह्यांनी इ० स० १७९९ मध्ये लिहून ठेवलेल्या माहितीप्रमाणे समाधानकारक नव्हता, व तिसरा मार्ग हैदराबाद व नागपूर येथे अमलांत आणून पाहिल्यामुळे तो स्वानुभवाने निरुपयोगी ठरला होता. तेव्हां लाडे डलहौसी ह्यांनी दुसरा मार्ग म्हणजे नबाबाकडे राजकीय हुद्दा वगैरे कायम ठेवून सर्व राज्य कायमचे आपल्या हाती घेणे हा-पसंत करून त्याचे अवलंबन करण्याचे ठरविले. त्याकरितां त्यांनी प्रथमतः नबाबास "इ० स०१८०१ च्या तहाच्या मर्यादेचा भंग झाला व अयोध्येच्या राज्याची बिलकल व्यवस्था राहिली नाही, ह्या• करितां तम्ही नवीन तह करावा: नाहीतर ब्रिटिश रोसडेट इग्रज सैन्यासह तेथून निघून जाईल;" अशी सूचना करावी असे योजिल, लॉर्ड डलहौसी ह्यांचा ठराव विस्तृत असून त्यांत राजनीतीच्या कुटिल स्वभावाचे बरेच प्रदर्शन होते. हा सर्व ठराव वाचनीय आहे, परंतु तो फार विस्तृत असल्यामुळे स्थलसंकोचास्तव येथे देता येत नाही. गव्हरनर जनरल ह्यांचा ठराव त्यांचे कौन्सिलचे सभासद मि०