पान:अयोध्येचे नबाब.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वा.] वाजिदअल्लीशहा. ११३ no marwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwnor बनले आहेत, आणि खुद्द दिवाणसाहेब वसुलाचे काम पहात आहेत ! ह्याप्रमाणे सर्वजण आपलें उखळ पांढरे करीत आहेत!"* ह्याप्रमाणे ज्या राज्यांत मूर्खपणाचा बाजार सुरू झाला, तेथें दुर्धर परिणाम घडून यावेत ह्यांत आश्चर्य ते काय ? कर्नल स्लीमन ह्यांनी नबाब वाजिदअल्लीशहा ह्याच्या मूर्खपणाच्या व अविचाराच्या अशा काही चमत्कारिक गोष्टी लिहिल्या आहेत की, त्या वाचून मनास एक प्रकारचा तिरस्कार व किळस वाटू लागते. त्याची व्यसनार्तता व विषयासक्ति इतकी विलक्षण होती की, तिचे वर्णन करणे म्हणजे पवित्र लेखणीस विटाळण्यासारखे आहे. त्याची लहरी व उच्छृखल मनोवृत्ति पुढे पुढे इतकी बेताल झाली होती की, त्याला आपण सिंहासनाधीश्वर आहोत ह्याचे मुळीच भान नाहीसे झाले. तो नानाप्रकारचे वेडे वेडेचार करू लागला. आणि शेवटी, मोहरमामध्ये असभ्य सोंगें घेऊन व गळ्यांत तबला अडकवून भररस्त्याने नाचूं बागडूं लागला. अशा अधम नबाबाची अपवित्र संगति राज्यलक्ष्मीस व विद्वान् लोकांस अप्रिय व्हावी ह्यांत आश्चर्य ते काय ? भोजप्रबंधामध्ये म्हटले आहे:

  • Sleeman's Oude, Vol. II. Page 369. कर्नल स्लीमन ह्यांनी दिवाण अल्लीनकीखान ह्या संबंधाने आणखी एके ठिकाणी असे लिहिले आहे की,

“He appears to me to be the most deeply interested of all in maintaining the worst abuses of the present system of administration, and I consider it painful and humiliating to be obliged, by my public duties, to hold, any longer, communication with such a person on the subject of the many evils which he could, but will not, remedy; of the many wrongs which he could, but will not redress; and of the many fearful sufferings which he could, but will not, relieve."