पान:अयोध्येचे नबाब.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. [भाग पातकानां समस्तानां द्वे परे पातके मते ॥ एकं दुःसचिवो राजा द्वितीयं च तदाश्रयः ॥१॥ "सर्व पातकांत दोन पातकें मोठी मानली आहेत; एक, दुष्ट प्रधान जवळ बाळगणारा राजा; आणि दुसरे, असल्या राजाचा आश्रय." तेव्हां अशा पापापासून सजनांनी दूर व्हावे हे साहजिकच आहे. असो. __नबाब वाजिदअल्ली हा दुर्व्यसनांत अगदी निमग्न झाला व त्याचे वर्तन सुधारण्याची आशा बिलकूल राहिली नाही; असे पाहून कर्नल स्लीमन ह्यांनी, ब्रिटिश सरकाराने सार्वभौमत्वाच्या नात्याने अयोध्येचा राज्यकारभार आपल्या हाती घ्यावा, आणि तो नबाबाच्या नांवाने आपण चालवावा, अशी गव्हरनर जनरल ह्यांस शिफारस केली. कर्नल स्लीमन ह्यांचा हेतु अयोध्येचे राज्य खालसा करावें असा बिलकूल नसून, फक्त तेथे माजलेली झोटींगपादशाही बंद करावी व तेथील राज्यव्यवस्था प्रजेस सुखावह होईल अशी करावी, असा होता. त्यांनी गव्हरनर जनरल लॉर्ड डलहौसी ह्यांस अयोध्येसारखें एतद्देशीय प्रचंड संस्थान नष्ट करणे ब्रिटिश सरकारास हितावह नसून तसे केले असतां आपल्या कीर्तीस कलंक लागेल असे स्पष्ट कळविले होते. परंतु लॉर्ड डलहौसी ह्यांचा कल एतद्देशीय संस्थाने खालसा करण्याकडे विशेष असल्यामुळे त्यांनी अयोध्येच्या बेबंदशाहीचा फायदा घेऊन, ते पूर्णपणे ब्रिटिश राज्यांत सामील करण्याचा विचार मनांत आणिला.

  • कर्नल स्लीमन ह्यांच्या विरुद्ध रिपोर्टामुळे अयोध्या संस्थान खालसा झालें असे कित्येकांचे मत आहे. परंतु कर्नल स्लीमन ह्यांचे स्वतःचे मत त्याच्या अगदी विरुद्ध होते असे त्यांच्या अनेक पत्रांवरून व्यक्त होते. त्यांनी आपले