पान:अयोध्येचे नबाब.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ अयोध्येचे नबाब. - [भाग ह्यांचे लक्ष्य ह्या वेळी ब्रह्मदेशांतील लढाईत गुंतल्यामुळे, त्यांनी तिचा विचार करण्याचे काम जरा लांबणीवर टाकिलें. परंतु अयोध्येची स्थिति दिवसेंदिवस अत्यंत निकृष्ट होत चालली. तेव्हां कर्नल स्लीमन ह्यांनी इ० स० १८५२ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये, गव्हरनर जनरल लॉर्ड डलहौसी ह्यांस असे लिहिले की, “नबाब वाजिदअल्ली हा जितके दिवस अधिक राज्य करील तितका तो राज्य करण्यास अधिक अपात्र होईल व तितका देशाचा व लोकांचा अधिक नाश होईल. ह्यापूर्वीच संस्थानचे दिवाळे निघाले असते, परंतु आज तीन वर्षे नबाब व त्याचे कुटिल मंत्रिमंडळ ह्यांनी अमजदअल्लीच्या कुटुंबावांचून राजघराण्यातील इतर सर्व लोकांच्या नेमणुका बंद केल्या आहेत. ह्यांपैकी बहुतेक लोकांची अत्यंत दीन स्थिति होऊन त्यांना ब्रिटिश सरकाराने मध्यस्ती केल्यावांचून नेमणुका मिळण्याची आशा राहिली नाही. पूर्वीच्या नबाबांच्या स्त्रियांनी आपल्या निर्वाहाकरितां कांही मिळावे म्हणून फार ओरड केली; परंतु तिचा उपयोग न होता त्यांना निर्दय व निर्कजपणानें, रस्तोरस्ती भिक्षा मागण्याकरितां किंवा काबाडकष्ट करण्याकरितां, राजवाड्यांतून हांकून लाविले आहे. खुद्द नबाबास गाणारे, बजावणारे, हलकट लोक आणि त्यांच्यापेक्षां नीच असे कुकवि ह्यांनी वेढून टाकिलें आहे. दिवाण व त्याचे हस्तक हे तर त्यांपेक्षाही वाईट आहेत. ते राज्याचा अर्धा वसूल आपल्या घशांत टाकितात व राज्यांतील सर्व खात्यामध्ये पानी अशा षंढ लोकांची नेमणूक करितात. तंतुवाद्यकार दिवाणीखात्याचे अधिकारी झाले आहेत, षंढ लोक फौजदारी खात्याचे अंमलदार